साऊथ सुपरस्टार सूर्या कोरोनाच्या विळख्यात

कोरोनाचा (Corona Virus) संसर्ग कमी होत असल्याच्या बातम्या रोज येत आहेत. कोरोनाची लस बाजारात आल्यापासून लोकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे आणि कोरोना बचावाचे नियम आता पाळले नाहीत तरी चालतील असे कदाचित त्यांना वाटत असावे. त्यामुळे एखाद्या दिवशी कमी कोरोनाग्रस्त सापडले की लगेच दुसऱ्या दिवशी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढलेली दिसते.

कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांना कोरोना होतो हे आपण समजू शकतो परंतु सगळी काळजी घेऊनही कोरोना कसा होतो ते समजत नाही. अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे आपण पाहिले आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनाही कोरोनाची लागण झालेली होती. आणि आता साऊथचा सुपरस्टार सूर्यालाही (South superstar Surya) कोरोनाही लागण झाल्याचे समोर आले आहे.

सुपरस्टार सूर्याचे पूर्ण नाव सूर्या शिवकुमार असून तामिळ सिनेसृष्टीत त्याचा दबदबा आहे. त्याची फॅन फॉलोईंगही जबरदस्त आहे.. अजय देवगणनने ‘सिंघम’ साकारून बॉक्स ऑफिसवर यश मिळवले होते. तो ‘सिंघम’ या सूर्याचाच मूळ सिनेमा आहे. सूर्याच्या ‘सिंघम’चे तीन भाग आतापर्यंत प्रदर्शित झालेले आहेत. आमिर खानचा ‘गझनी’ही सूर्याच्याच सिनेमाची रिमेक होती. सूर्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सूर्याने त्याला कोरोना झाल्याची माहिती सोशल मीडियावरच दिली आहे. सूर्याने त्याच्या ट्विटर अकाउंटर ट्विट करीत म्हटले आहे, ‘मला कोरोनाची लागण झालेली असून मी त्यावर उपचार घेत आहे. कोरोना अजूनही गेलेला नाही. त्यामुळे सर्व काही ठीक झाले आहे असे नाही. घाबरून चालणार नाही मात्र सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. माझ्यावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे खूप खूप धन्यवाद. असेही सूर्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. सूर्याने केलेले हे ट्विट प्रचंड व्हायरल झाले असून त्याचे फॅन्स आणि त्याचे सहकलाकार त्याला लवकर बरा होण्याच्या शुभेच्छा देत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER