रांची कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव; भारताने मालिका ३ – ० ने जिंकली

Test Match

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसरा कसोटी सामना भारताने १ डाव २०२ धावांनी जिंकला. डावाचा पराभव टाळण्यासाठी आफ्रिकेला ३३५ धावांची गरज होती. आफ्रिकेचा संघ १३३ धावात बाद झाला. भारताने मालिका ३ – ० ने जिंकली.


रांची : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसरा कसोटी सामना भारताने १ डाव २०२ धावांनी जिंकला. डावाचा पराभव टाळण्यासाठी आफ्रिकेला ३३५ धावांची गरज होती. आफ्रिकेचा संघ १३३ धावात बाद झाला. भारताने मालिका ३ – ० ने जिंकली.

या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने पहिल्या डावात फलंदाजी करताना ४९७ धाव केल्या होत्या. आफ्रिकेने पहिला डावात १६२ धावा केल्या. भारताकडे ३३५ धावांची आघाडी असल्याने भारताने आफ्रिकेला फॉलो-ऑन दिला. आफ्रिकेचा दुसरा डावही कोसळला संघ दुसऱ्या डावात १३३ धावात बाद झाला.

दुसऱ्या आफ्रिकेचे फक्त ३ फलंदाज २० चा आकडा पार करू शकले. थियनिस डी ब्रूयन (३०), जॉर्ज लिंडे (२७), डेन पायटेड (२३). ७ फलंदाज धावांचा दुहेरी आकडाही पार करू शकले नाहीत. दुसऱ्या डावात भारतातर्फे मोहंमद शामीने ३, उमेश यादव, शाहबाझ नदीमने प्रत्येकी २ आणि रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी १ गडी बाद केला. लिंडे धावबाद झाला.