साऊथचे अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

South actor Jayaprakash Reddy dies of heart attack

माद्यमांच्या रिपोर्टनुसार जयप्रकाश रेड्डी (Jaiprakash Reddy) यांना बाथरुममध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. रेड्डी हे कुर्नूलच्या अल्लागड्डा येथील आहेत. १९८० पासून त्यांनी अनेक सिनेमात काम केले होते. तेलुगु सिनेमात त्यांना जेपी नावाने ओळखलं जायचं.

तेलुगु सिनेमाचे प्रेक्षक जयप्रकाश रेड्डी यांना कॉमेडी एक्टर म्हणून ओळखत असे. त्यांनी ब्रम्हपुत्रुदू या सिनेमापासून आपलं करिअर सुरु केले होते.

जयप्रकाश रेड्डी यांच्या निधनानं टॉलिवूड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक बॉलिवूड (Bollywood) कलाकारांनीही त्यांच्या निधानाने शोक व्यक्त केला आहे. आंधप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी जयप्रकाश रेड्डी यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER