सौरव गांगुलीवर पुन्हा अँजिओप्लास्टी, प्रकृती स्थिर

S Ganguly

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) (BCCI) चे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीवर (Sourav Ganguly) आणखी एक अँजिओप्लास्टी (Angioplasty) करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. छातीत त्रास होत असल्याने त्यांना कोलकाता येथील एका अपोलो दवाखान्यात गुरुवारी दाखल करण्यात आले होते. त्यांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याचे दवाखान्याच्या सुत्रांनी सांगितले.

डॉ. आफताब खान, डॉ, अश्विन मेहता, डॉ. देवी शेट्टी, डॉ. अजित देसाई, डॉ. सरोज मोंडल आणि डॉ. सप्तर्षी बासू यांच्या टीमने त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली आणि दोन स्टेंट बसविण्यात आले आहेत अशी माहिती दवाखान्यातर्फे देण्यात आली आहे.

याआधी याच महिन्यात कोलकाता येथीलच वूडलँडस् दवाखान्यात त्यांच्यावर पहिली अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. सौरवचे बंधू स्नैहाशीष यांच्यावरसुध्दा गेल्याच आठवड्यात अपोलो हाॕस्पीटल येथेच अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. विख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. देवी शेट्टी यांनी सौरवलासुटी देताना सांगितले की त्यांचे हृदय अगदी व्यवस्थित आहे. फक्त काही वाहिन्या बंद झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना त्रास होत होता. पण यौग्यवेळी ते योग्य ठिकाणी उपचारासाठी दाखल झाल्याने चिंता नाही. त्यांचे हृदय वीस वर्षांच्या तरुणाचे असते तैवढेच मजबूत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER