… म्हणून धोनीला पाकिस्तानविरुद्ध तिसर्‍या क्रमांकावर पाठवले होते- सौरव गांगुली

Dhoni & Saorav Ganguly

माजी कर्णधार गांगुली म्हणाला की माझा यावर नेहमीच विश्वास होता कि त्याने वरच्या फळीत फलंदाजी केली पाहिजे कारण तो खूप स्फोटक फलंदाज आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नेतृत्वात महेंद्रसिंगने आपला पहिला मोठा डाव खेळला होता. धोनीला तिसर्‍या क्रमांकावर पाठविणारा कर्णधार गांगुली होता आणि अजूनही त्याला असे वाटते की, लोअर ऑर्डरपेक्षा तो वरच्या फळीत अधिक यशस्वी फलंदाज ठरला असता.

गांगुली म्हणाला, “मला वाटते की प्रत्येक जण याबद्दल बोलतो की, तो लोअर ऑर्डरमध्ये सामना कसा पूर्ण करतो. मी कर्णधार असताना त्याने तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी केली होती, वाइजैकमध्ये पाकिस्तानविरुद्ध १४८ धावांची खेळी केली होती. मला नेहमी विश्वास होता की, त्याने वरच्या फळीत फलंदाजी करावी; कारण तो खूप स्फोटक फलंदाज आहे.”

गांगुलीचे मत आहे की, धोनीने तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी होती. या क्रमांकावर त्याने १६ सामन्यांत ८२.७५ च्या सरासरीने एकूण ९९३ धावा केल्या आहेत. तसेच चौथ्या क्रमांकावर त्याने ३० डावांमध्ये ५६.५८ च्या सरासरीने १३५८ धावा केल्या आहेत तर पाचव्या स्थानावर ५०.३० च्या सरासरीने ३१६९ धावा केल्या आहेत.

“मर्यादित षटकांच्या स्वरूपातील सर्वोत्कृष्ट खेळाडू तो असतो ज्याच्यामध्ये आपल्या इच्छेने कोणत्याही वेळी चौकार लावण्याची क्षमता असते. तुम्ही एकदिवसीय क्रिकेटचा इतक्या वर्षांचा इतिहास पाहा दडपणाखाली महान खेळाडू सतत सीमारेषा पार चेंडू पोहचवितो आणि धोनी त्यापैकी एक आहे. म्हणूनच मी त्याला निवडले होते.”

“ते माझे काम होते, हो की नाही? प्रत्येक कर्णधाराचे काम एक चांगला खेळाडू निवडणे आणि शक्य तितका सर्वोत्कृष्ट संघ तयार करणे. तुम्ही तुमच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेचे अनुसरण करता, त्या खेळाडूवर विश्वास ठेवता की, तो तुमच्यासाठी चांगले काम करेल आणि मला आनंद आहे की, भारतीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीसारखा खेळाडू सापडला; तो केवळ फिनिशर नाही तर क्रिकेट जगातील एक महान खेळाडू आहे.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER