सौरव गांगुलीने केले ग्लेन मॅक्सवेलच्या आवडत्या स्विच हिट शॉटचे समर्थन

Sourav Ganguly - Glenn Maxwell

क्रिकेट जसजसे प्रसिद्ध होत आहे तसतसे या खेळात बर्‍याच नवीन गोष्टी समोर येत आहेत. आजकाल ग्लेन मॅक्सवेलच्या (Glenn Maxwell) शॉट्सची खूप चर्चा आहे. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुलीलाही (Sourav Ganguly) हा शॉट खूप आवडतो.

टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने क्रिकेटमधील स्विच हिट शॉटला पाठिंबा दर्शविला आहे. नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने स्विच शॉट्सचा बराच वापर केला आहे.

सौरव गांगुली म्हणाला, ‘खेळाने बरीच प्रगती केली आहे, त्यामुळे आधुनिक फलंदाजांकडून असे फटके रोखता येऊ शकतात असे मला वाटत नाही. अशा प्रकारचे धैर्यपूर्वक फटके दाखविण्यासाठी आपल्याला धैर्य आणि सामर्थ्यची आवश्यकता असते. टाइमिंग आणि पायांची हालचाली व्यतिरिक्त अश्या अनेक कौशल्ये आहेत ज्यांना हा शॉट खेळण्यासाठी आवश्यक आहे.

गांगुली पुढे म्हणाला, ‘केविन पीटरसनने हा शॉट प्रथमच खेळला आणि त्यानंतर डेव्हिड वॉर्नरचे नाव आले. जर आपण चांगले खेळत असाल तर हा खरोखर एक चांगला शॉट आहे.’ इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने २०१२ मध्ये कसोटी सामन्यादरम्यान स्विच हिट शॉट खेळला होता आणि त्याला श्रीलंकेने विरोध केला होता. तथापि, ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेलने असे फटके गोलंदाजांना योग्य नसल्याचे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER