छातीत दुखत असल्याने सौरव गांगुली रुग्णालयात दाखल

Sourav Ganguly

कोलकाता : टीम इंडियाचे (Team India) माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे (BCCI) विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यांना आज पुन्हा हृदयाशी संबंधित त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही दिवसांपूर्वीच गांगुली यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांच्या उपचारानंतर ते घरी परतले होते. मात्र आज पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागला आहे.

सौरव गांगुलींच्या कुटुंबातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्रीपासून सौरव गांगुली यांच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यानंतर आज सकाळी त्यांनी डॉक्टरांशी बातचीत केली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. नुकतीच माहिती मिळाली आहे की, गांगुलींच्या कुटुंबीयांनी नुकतेच त्यांना रुग्णालयात नेले आहे.

ग्रीन कॉरिडोर बनवून त्यांना बेहला येथील घरापासून अपोलो रुग्णालयापर्यंत नेण्यात आले. अपोलो रुग्णालयात डॉ. आफताब खान यांच्या देखरेखीखाली गांगुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यापूर्वी या महिन्याच्या सुरुवातीलाच गांगुली यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला होता. गांगुली राहत्या घरी वर्कआऊट करत होते. या दरम्यान त्यांना छातीत दुखू लागले होते. त्यानंतर त्यांना त्वरित वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल केले गेले. गांगुलीवर उपचार करण्यासाठी एकूण चार डॉक्टरांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली. गांगुलीवर शस्त्रक्रिया करून ब्लॉकेज काढण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER