सौम्या पांडे १५ दिवसांच्या बालिकेला घेऊन आल्यात कामावर !

सौम्या पांडे

गाजियाबाद :- उत्तरप्रदेशातील गाजियाबादच्या (Ghaziabad) उपविभागीय दंडाधिकारी सौम्या पांडे (Soumya Pandey) (२६) या त्यांच्या १४ दिवसांच्या बालिकेला घेऊन कार्यालयात हजर झाल्या आहेत. कोरोनाची (Corona) साथ रोखण्याच्या कामात मदत व्हावी म्हणून त्यांनी बाळाला घेऊन कामावर येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे सर्व स्तरांमधून कौतुक होते आहे.

सध्या मोदीनगरच्या उपविभागीय दंडाधिकारी असणाऱ्या सौम्या यांना सातवा महिना सुरू असताना जुलै महिन्यात त्यांना कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये गाझियाबाद जिल्ह्याच्या नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले.  तेव्हा जिल्ह्यात दररोज १०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत होते. सौम्या यांना ‘मॅटर्निटी लीव्ह’चा पर्याय उपलब्ध होता. मात्र त्यांनी सुटी  घेतली नाही. आपल्या क्षेत्रात दौरे सुरूच ठेवले. अनेक ठिकाणी जाऊन आरोग्य व्यवस्थांची पाहणी केली.

१७ सप्टेंबर रोजी सौम्या यांनी मेरठमधील एका रुग्णालयात मुलीला जन्म दिला. अवघ्या १४ दिवसांनंतर त्या मुलीला घेऊन कार्यालयामध्ये कामाला रुजू झाल्या. त्या मानतात – डॉक्टर, नर्स आणि अनेक लोक कोरोनाच्या कालावधीमध्ये अथक कष्ट करत आहेत. अशा वेळेस मी कर्तव्यापासून दूर राहणे चूक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER