सोपोर येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक!

Sopore fire brigade in security forces and terrorists!

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथे सोमवारी संध्याकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. भारतीय लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तरित्या दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली असून, सोपोरमध्ये दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच, जवानांनी कारवाई करण्यास सुरुवात केली.

ही बातमी पण वाचा : जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

चकमक सुरू झाल्यानंतर खबरदारी म्हणून सोपोर आणि आसपासच्या परिसरातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळू नये, यासाठी जवानांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली. तर दुसरीकडे जम्मू काश्मीमधील बडगाव येथील पकेरपोरा गावातही दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरातही जवानांनी शोध मोहिमेला सुरूवात केली आहे.