फॉर्म्युला थ्री रेसिंगमध्ये आता महिला रेसिंगपटू, सोफिया फ्लोर्श घडवणार इतिहास

sofia florsch

जर्मनीची सोफिया फ्लोर्श ही महिलांसाठी धाडसाचे आणखी एक दालन उघडणार आहे. ही 19 वर्षीय जिगरबाज खेळाडू फॉर्म्युला 3 मोटार रेसिंगमध्ये भाग घेणारी पहिली महिला ठरणार आहे. विशेष म्हणजे 18 महिन्यांपूर्वीच सोफिया मकाऊ ग्रँड प्रिक्स स्पर्धेतील अपघातात अतिशय गंभीर जखमी झाली होती. तिच्या पाठीच्या मणक्यांना गंभीर इजा झाली होती. त्यातून सावरत ती 18 महिन्यांतच रेसिंग ट्रॅकवर परतली आहे आणि यासाठी तिला यंदाचा लॉरियस कम्बक ऑफ दी इयर पुरस्कार देण्यात आला आहे.

शेफालीस बिनधास्त क्रिकेट खेळायची मूभा आहे- शिखा पांडे

आता ती फॉर्म्युला तीन रेसिंगमध्ये भाग घेणार आहे आणि त्यासाठी यंदाच्या मोसमात तिला कम्पोस रेसिंग टीमने करारबध्द केले आहे.

मकाऊ ग्रँड प्रिक्समधील अपघातानंतर सावरलेल्या सोफियाने शस्रक्रियेनंतर फॉर्म्युला रिजनल युरोपियन चॅम्पिअनशिपमध्ये भाग घेतला.या स्पर्धेत ती सातव्या स्थानी राहिली. गेल्यावर्षीच मकाऊ ग्रँड प्रिक्समध्येच पुनरागमन करतांना तिने धैर्याच्या कसोटीत ती किती खंबीर व कणखर आहे ते दाखवून दिले. गेल्यावर्षी मोटार रेसिंगच्या जीपी 3 आणि युरोपियन फॉर्म्युला थ्री शर्यंतीं एकत्र करून यंदापासून फॉर्म्युला थ्री रेसिंग सुरु करण्यात येत आहे. त्यात भाग घेणारी सोफिया ही पहिली महिला रेसिंगपटू ठरणार आहे.

कम्पोस रेसिंग टीमसोबत एफआयए एफ 3 चॅम्पिअनशिप मध्ये सहभागी होणार असल्याचा मला खूप आनंद आहे. पायरेल्ली टायर्स, डीआरएस आणि मेकाक्रोम इंजिनसोबत फॉर्म्युला थ्री रेसिंगचा माझा हा पहिलाच अनुभव असेल. त्यात जगातील सर्वोत्तम ड्रायव्हर्सशी स्पर्धा करण्यास मी उत्सुक आहे असे तिने म्हटले आहे.

प्रत्येक आठवड्याला कामगिरीत सुधारणा करत, आपल्या चमूसोबत समन्वय राखत आनंद लुटण्याचा माझा प्रयत्न असेल. त्यामुळे हे वर्ष खास ठरणार आहे.

ग्रुनवाल्ड गावची ही रेसिंगपटू 2015 पासून मोटाररेसिंग करतेय. गिनेटा ज्युनियर चॅम्पिअनशिपमध्ये शर्यत जिंकणारी ती सर्वात कमी वयाची स्पर्धक ठरली. एड्रियन कम्पोसच्या संघात ती अलेक्स पेरोनी व अलेसियो डिलेड्डा यांच्यासोबतच ती रेसर असेल.