उद्धव ठाकरेंना लवकरच २ हजार कोटींच्या वसुलीचा हिशोब द्यावा लागेल, सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya-Uddhav Thackeray

मुंबई :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल (filed-a-case-against-anil-deshmukh-cbi-raids-house-office) केला आहे. सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, विविध ठिकाणांची झाडाझडती घेण्यास सीबीआयने सुरुवात केली आहे. मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे इथल्या मालमत्तांवर सीबीआयचं छापासत्र सुरू आहे.

सीबीआयच्या आजच्या कारवाईनंतर अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांच्या अडचणीत भर पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. आणि अश्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे. ‘सचिन वाझे (Sachin Vaze) २००० कोटींची वसुली गँग प्रकरणात सीबीआयकडून आता अनिल देशमुखांवर कारवाई होत आहे. मंत्री अनिल परब यांचीही काही दिवसात हीच स्थिती होईल. आणखी २ मोठे नेते लाभार्थी आहेत. २ हजार कोटी गोळा झाले. ते कुठे कुठे गेले? आता सीबीआय कारवाई करत आहे. ईडीसुद्धा तपास करत आहे. एनआयए आहे. पुढील काही दिवसांत आयकर विभागदेखील येईल. उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) २ हजार कोटींच्या वसुलीचा हिशोब द्यावा लागेल,’ असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button