लवकरच पेंग्विन ‘या’ केसमध्ये सापडणार; निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

Nilesh Rane - Aaditya Thackeray Tweet

मुंबई : सुशांतची (Sushant Singh Rajput) मॅनेजर दिशा सालियनने आयोजित केलेल्या एका पार्टीत शिवसेना (Shiv Sena) नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) उपस्थित असल्याचा खुलासा अभिनेत्री नूपुर मेहता (Nupur Mehta) हिने केला आहे . यावरून भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आदित्य ठाकरेंवर पुन्हा निशाणा साधला .

निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले की , कितीही लपवलं तरी सत्य एक ना एक दिवस बाहेर येतं. मागच्या ७५ दिवसांमध्ये अनेक वेळा विषय वळवण्याचे व पुरावे नष्ट करण्याचे प्रयोग झाले; पण सगळं झाकणं कोणाला शक्य नाही म्हणून लवकरच पेंग्विन ह्या केसमध्ये सापडणार, असा आरोपदेखील राणे यांनी केला आहे .

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे, की सुशांतच्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. मात्र भाजप नेते नारायण राणे यांनी माझ्याकडे काही पुरावे असून ते थोड्याच दिवसांत समोर आणणार असून युवा मंत्री यामध्ये सामील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER