मराठा आरक्षणाबाबत लवकरच आघाडी सरकारची पोलखोल – चंद्रकांत पाटील

Maratha Reservation - Mahavikas Aghadi - Chandrakant Patil

मुंबई :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) हत्या केली आहे. मराठा आरक्षण घालवण्याचं काम या सरकारनं केलं आहे, असा आरोप करत आघाडी सरकार मराठा समाजाला (Maratha Community) आरक्षण देण्यात कुठे कमी पडलं, याची पोलखोल करण्यासाठी आम्ही लवकरच कायदेतज्ज्ञांची समिती स्थापन करणार आहोत, अशी माहिती भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली.

मराठा आरक्षणावर अभ्यास करण्यासाठी भाजपने एक समिती स्थापन केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar), नारायण राणे, आशिष शेलार, विनायक मेटे, नरेंद्र पाटील आणि श्रीकांत भारतीय यांचा समावेश आहे. आज या समितीची पहिली बैठक मुंबईत झाली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी  पत्रकार परिषद घेऊन बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. घटनात्मक कार्यवाही करून हे आरक्षण देण्यात आलं होतं. हाय कोर्टातही हे आरक्षण टिकवलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणाला वर्षभर स्थगिती मिळवू दिली नाही. पण आघाडी सरकारने सत्तेत येताच या आरक्षणाचा खून केला. आरक्षणाचा मुडदा पाडला. माती केली, अशी टीका पाटील यांनी केली.

मराठा आंदोलने होऊ नये यासाठी कोरोनाचे कारण पुढे करून निर्बंध घालण्यात आले. मराठा तरुणांचं भविष्य धुळीस मिळालं आहे. त्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे. एक दिवस उशिरा स्थगिती मिळाली असती, अनेकांना प्रवेश मिळाला असता. आता मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही सहभागी होणार आहोत. या आंदोलनात आम्ही पक्ष म्हणून सहभागी होणार नाही, असं सांगतानाच आम्हीही कायदेतज्ज्ञांची एक समिती स्थापन करणार आहोत. मराठा आरक्षण कायम राखण्यात आघाडी सरकार कुठं कमी पडलं याची पोलखोल करण्याचं काम ही समिती करणार आहे. मराठा आरक्षण हा राज्याचा विषय असल्याने राज्यानेही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.

ही बातमी पण वाचा : चव्हाणांना राग येत असला तरी मराठा आरक्षणासाठी गप्प बसणार नाही – चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button