सोनू सूदचा खलनायकी भूमिकांना नकार

Sonu Sood

सोनू सूद (Sonu Sood) म्हणजे बॉलिवुड (Bollywood) आणि साऊथच्या सिनेमातील यशस्वी खलनायक. काही हिंदी सिनेमात तो सहनायकही होता, पण त्याने खरे यश खलनायक म्हणूनच मिळवले होते. फार कमी जणांना ठाऊक आहे की, सोनू सूद डायलॉग्जही लिहितो. सलमान खानच्या दबंगसाठी त्याने लिहिलेले डायलॉग्ज चांगलेच लोकप्रिय झाले होते. त्याचा खलनायकही प्रेक्षकांना आवडत असे. मात्र कोरोना काळात पडद्यावर खलनायक म्हणून अत्याचार करणाऱ्या सोनूने गरीबांना मदतीचा हात दिला. गरीबांना मदत करण्यासाठी त्याने आपली संपत्ती गहाण ठेऊन 10 कोटी रुपयांचे कर्जही घेतले. त्याने केलेल्या मदतीमुळे सोनू भारतभरातील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्याला ट्विटरवर मदतीची हाक मारली की तो लगेचच मदतीला धावतो. त्याचे हे काम अजूनही सुरु आहे. देशभरातील प्रेक्षकांच्या मनात सोनूची इमेज ही मोठ्या भावाची झाली आहे. त्यामुळेच सोनूने आता पडद्यावर खलनायक न साकारण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना (Corona) काळात सोनूशी बोलताना तू आता पडद्यावरील नव्हे तर खरा नायक झाला आहेस. पडद्यावर खलनायक साकारत राहाणार का असा प्रश्न विचारला होता. तेव्हा सोनूने सांगितले होते, मला आता नायकाच्याच भूमिका ऑफर होऊ लागल्या आहेत. मात्र काही निर्माते अजूनही मला खलनायकाच्या भूमिकेत घेऊ इच्छित आहेत. मी एक कलाकार असल्याने भूमिका पाहून मी सिनेमे साईन करणार असे सांगितले होते. मात्र सोनूने आता सिनेमात खलनायकाची भूमिका न साकारण्याचा निर्णय घेतला असून असे सिनेमे त्याने नाकारल्याचे समजते.

सोनू म्हणतो, कोरोना काळात गरीबांना कराव्या लागणाऱ्या संकटाचा मी फार जवळून अनुभव घेतला आहे. त्यामुळे गरीबांना संकटात टाकणाऱ्यांविषयी माझ्या मनात घृणा निर्माण झाली आहे. सिनेमात मी असाच त्रास देत असतो. पण आता मी तसे न करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांवर सकारात्मक परिणाम होईल अशा भूमिका करणार असल्याचेही सोनूने स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER