
साऊथ आणि हिंदी सिनेमात व्हिलनची भूमिका करणारा सोनू सूद (Sonu Sood) कोरोना (Corona) काळात मात्र रियल हीरो झाला होता. अनेक श्रमिकांना त्यांच्या राज्यात जाण्यास सोनूने मदत उपलब्ध करुन दिली होती. एवढेच नव्हे तर गेल्या सात-आठ महिन्यांपासून तो रोज देशभरातील गरजूंना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करीत आहे. पडद्यावरील हा व्हिलन वास्तवात मात्र हीरो ठरल्याने त्यानेही सिनेमात व्हिलन न बनण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर तो ज्या सिनेमात व्हिलन म्हणून येणार आहे त्या सिनेमाचा नायक त्याला पडद्यावर मारण्यासही तयार नाही. याबाबतची बातमी आम्ही तुम्हाला दिली होतीच. याच सोनूला किसान बनवून आता रुपेरी पडद्यावर आणले जाणार आहे.
साऊथचा प्रख्यात दिग्दर्शक ई निवासने किसान नावाच्या सिनेमाला सुरुवात केली असून यात मुख्य नायकाची भूमिका सोनू सूद साकारणार आहे. आयुष्मान खुरानच्या ड्रीमगर्ल सिनेमाची निर्मिती-दिग्दर्शन करणारा राज शांडिल्य या सिनेमाची निर्मिती करणार आहे. सिनेमातील अन्य कलाकारांची निवड अजून झालेली नाही. यावर्षी हा सिनेमा फ्लोअरवर जाणार असून यावर्षीच तो प्रदर्शित केला जाणार आहे. किसान सिनेमा करणाऱ्या सोनू सूदचे त्याच्या प्रशंसकांनी अभिनंदन तर केले आहेच सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर अभिनंदन केले आहे. अमिताभ यांनी म्हटले आहे की, ‘सोनू सूदची मुख्य भूमिका असलेल्या आणि ई निवासच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या ‘किसान’ला खूप खूप शुभेच्छा.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला