गरजू विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदने आईच्या नावाने सुरू केली स्कॉलरशिप

Sonu sood

मुंबई :  हिरो असावा तर असा, असंच काहीसं म्हणण्याची वेळ अभिनेता सोनू सूदच्या प्रभावशाली कामामुळे आली आहे. सोनू सूद मागील चार-पाच  महिन्यांपासून  लोकहितासाठी केलेल्या कार्यामुळे विशेष चर्चेत आहे.

लॉकडाऊनमध्ये पायी पायी निघालेल्या कामगारांसाठी बस, रेल्वेची सोय करून त्यांना त्यांच्या घरी पोहचवणे, परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणणे, कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे, पुण्याच्या लाठीकाठी चालवणा-या आजीला लाठी काठीचे प्रसिक्षण वर्ग सुरू करून देऊन त्यांची आयुष्याची सोय करून देणे अशा या ना त्या अनेक चांगल्या कार्यामुळे सोनू सूद विशेष चर्चेत आहे.

आता त्याने गरजू विद्यार्थ्यांसाठी (Needy students) मोठे पाऊल उचलले आहे. पैशाअभावी अनेक हुशार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. अशा गरजू विद्यार्थ्यांना सोनू सूद मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देत आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी त्याने स्कॉलरशिप सुरू केली आहे.

या स्कॉलरशिपला सोनू सूदने (Sonu sood) आपल्या दिवंगत आईचे नाव (Mother Name) दिले आहे. त्याने  ट्विट करत ही माहिती दिली . उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप (Scholarship) लाँच करत आहे.

आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचण्यासाठी आर्थिक आव्हाने अडचणी ठरू नये, असा माझा विश्वास आहे. स्कॉलरशिपसाठी पुढील १० दिवसांत  [email protected]  मेलवर अर्ज करा- असे सोनू सूदने ट्विट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER