अभिनेता सोनू सूदने घेतली राज्यपालांची भेट

Sonu Sood-Rajyapal Koshyari

मुंबई :- प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. स्थलांतरित लोकांना त्यांच्या मूळ राज्यात पोहचविण्यासाठी तसेच लाखो लोकांच्या भोजन व्यवस्थेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची सूद यांनी राज्यपालांना माहिती दिली,’ असे ट्विट राज्यपालांनी केले.

सोनू सूदच्या कामाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. पडद्यावर क्रूर खलनायक साकारणारा सोनू सूद आता खऱ्या आयुष्यात नायक ठरला आहे..

दरम्यान भारतात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून देश लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊन काळात लाखो मजूर आपल्या घरापासून दूर परराज्यात अडकून पडले आहेत. अशा मजुरांची मूळगावी परतण्यासाठी जीवापाड धडपड सुरू आहे. त्यांना घरी पोहचविण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करतेच आहे. मात्र या कार्यात बॉलिवूडचा एक सेलिब्रिटीही मजुरांच्या मदतीला धावून आला आहे. खरं तर हा बॉलिवूडचा हिरो नाही तर खलनायक आहे. त्याचं नाव आहे ‘सोनू सूद’. सोनू हजारो स्थलांतरितांसाठी बसेसची आणि जेवणाची व्यवस्था करतोय. त्यामुळे पडद्यावर ‘खलनायक असला तरी खऱ्या आयुष्यातला तो हिरो आहे’ अशा शब्दांत सर्वच स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER