मनपाच्या नोटिसविरोधात सोनू सूद उच्च न्यायालयात, आज होणार सुनावणी

Bombay High Court - Sonu Sood

सोनू सूदने (Sonu Sood) जेव्हा कोरोना (Corona) काळात श्रमिकांना मदत करण्यास सुुरुवात केली. तेव्हा शिवसेनेने (Shiv Sena) त्याच्यावर टीका करीत तो भाजपचा (BJP) अजेंडा राबवत तर नाही ना, त्याला पैसे कोँण पुरवतो असे प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर शिवेसनेने कंगना रनौतला (Kangana Ranaut) टार्गेट केले होते. कंगनाचे ऑफिस तर शिवसेनेती सत्ता असलेल्या मनपाने तोडलेच, कंगनावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. कंगनानंतर शिवसेनेने आता सोनू सूदकडे पुन्हा नजर वळवली आहे. मनपाने सोनूच्या एका निवासी इमारतीचा हॉटेलमध्ये कन्व्हर्ट करण्याबाबत नोटीस पाठवली आहे. सोनूने या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली असून आज म्हणजे सोमवारी न्यायालयात सोनूच्या अर्जावर सुनावणी होणार आहे.

त्यामुळे कंगनानंतर आता मनपा आणि सोनू सूदमध्ये वाद रंगणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मनपाने ऑक्टोबर महिन्यात सोनूला नोटीस पाठवली होती. या नोटीसमध्ये मनपाने म्हटले होते, सोनूने त्याच्या जुहू येथील शक्ती सागर या सहा मजली निवासी इमारतीत मनपाची परवानगी न घेता हॉटेल सुरू केले. तसेच मनपाची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे बांधकामात बदल केला आहे. सोनूने महाराष्ट्र राज्य शहर नियोजन कायद्याचे उल्लंघन केल्याचेही या नोटीसमध्ये म्हटले होते. सोनूने या नोटीसविरोधात स्थानिक न्यायालयात धाव घेतली होती. पण त्याला अजून दिलासा मिळालेला नाही. मनपाने सोनूला तीन आठवड्यात उच्च न्यायालयात जाण्याची मुदतही दिली होती. ही मुदत संपल्यानंतर 4 जानेवारी रोजी मनपाने जुहू पोलीस स्टेशनमध्ये सोनूविरोधात तक्रार दाखल करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आता सोनूने या तक्रारीच्या विरोधात सोनू सूद मुंबई उच्च न्यायालयात धावला आहे. सोनू सूदच्या वतीने वकील डी. पी. सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत त्यांनी, सोनूने कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम न केल्याचा दावा केला आहे.

एकूणच आता सोनू आणि शिवसेनेच्या लढाईचा नवा अध्याय दिसू लागण्याची शक्यता दिसू लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER