सोनू सूदने केरळमध्ये अडकलेल्या १७७ मुलींना केले एअरलिफ्ट

Sonu Sood

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरीत मजुरांसाठी सोनू सूदने मोलाची मदत केली आहे. आतापर्यंत त्याची मैत्रीण निती गोएलच्या मदतीने हजारो मजुरांना आपल्या मायभूमीवर परत पाठवलं आहे. त्याची ही मदत आता केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नसून त्याने एर्नाकुलममध्ये (केरळ) अडकलेल्या १७७ मुलींना ओडिसातील भुवनेश्वर येथे एअरलिफ्टने पाठवले आहे.

माहितीनुसार , एर्नाकुलम येथे शिलाई आणि अ‌ॅम्ब्रॉ़डरी आर्टीस्ट म्हणून काम करत असलेल्या मुली लॉकडाऊनमुळे तिथंच अडकून होत्या. फॅक्टरी बंद असल्याने आता कुठे जायचं हा प्रश्न उभा राहिला होता. मात्र सोनू सूदला हा याबाबतची माहिती मिळाल्यावर त्याने या मुलींना घरी सोडण्याची जबाबदारी घेतली. यासाठी बंगळुरू येथील एअरक्राफ्ट मागवण्यात आले. मुलींना कोची येथून सकाली ८ वाजता एअरलिफ्ट करण्यात आले.

ही बातमी पण वाचा : आता बॉलिवूडचा ‘सिंघम’ मैदानात; अजय देवगणने धारावीतील ७०० कुटुंबांची घेतली जबाबदारी

सोनूने आतापर्यंत हजारो प्रवासी मजूरांना त्यांच्या घरी पाठवले आहे. अजूनही तो अहोरात्र त्यांची मदत करत आहेत. बॉलिवूड जगतातून त्याच्या या कामाचं कौतुक होत असून अनेकांनी आता त्याला मदतीचा हात देऊ केला आहे. जो पर्यंत शेवटचा मजूर त्यांच्या घरी जात नाहीत तो पर्यंत हे काम सुरुच ठेवणार; असा निश्चयच सोनूनं केला आहे. इतकंच नव्हे तर आता तो विद्यार्थ्यांच्या मदतीला देखील धावला आहे. याच त्याच्या उद्दात कार्यामुळे सर्व स्थरावरून त्याचे कौतुक होत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER