सोनू, तुला वीजबिल भरायचे नाय का? थकीत वीजबिल भरण्यासाठी महावितरणची सुरेल साद

MSEDCL

कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील वीजबिल हा अजून वादाचा मुद्दा आहे. या काळातील बिल कमी होणार नाही, अस निर्णय सरकारने घेतला आहे. आतापर्यंत वीजबिल भरण्यासाठी सक्ती करणारी कंपनी ‘महावितरण’ आता ग्राहकांना – सोनू, तुला वीजबिल भरायचे नाय का? अशी सुरेल साद देत थकीत बिल भरण्याचे आवाहन करत आहे!

यासाठी महावितरणने एक ऑडिओ क्लिप तयार केली आहे. वीज बिल भरण्याचे आवाहन परिणामकारक ग्राहकांपर्यंत पोहोचावे म्हणून ‘सोनू, तुझा माझ्यावर भरवसा नाय का?’ या गाजलेल्या गाण्यासारखेच गाणे महावितरणने तयार केले आहे.

लॉकडाऊन काळात वीज वापरली आहे तर त्याचे बिल भरण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे असे या गाण्यात सांगण्यात आले आहे.

वीज ग्राहकांकडे थकीत बिल वसूल कऱण्यासाठी गेलेले महावितरणचे कर्मचारी हे गाणे थकबाकीदाराला वाजवून दाखवतात, यात कशा पद्धतीने विजेचा वापर केला आहे, कशासाठी वीज वापरली आहे याचा उल्लेख आहे.

गाणे

सोनू आहे राज्याची शान,

सोनूला गावात मान.

सोनूचा मोबाईल भारी,

सोनूची गाडी पण भारी!

सोनू आमचा ग्राहक लाडका

आम्ही त्याला वीज देतो बरं का?

सोनूची कॉलर टाईट,

वीज बिल भरायला वाटते वाईट!

सोनू, तुला वीज बिल भरायचे नाही का?

सोनू आमचा आंघोळीला जातो

गिजरला लागते लाईट,

मात्र वीज बिल भरायला वाटते वाईट.

सोनू, तुला वीज बिल भरायचे नाही का?

ज्या ग्राहकांनी बिले भरली नाहीत त्याचे कनेक्शन कापण्यास महावितरणने १ मार्च पासून सुरुवात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER