सोनिया अजूनही म्हणतात, शिवसेनेची संगत नकोच !

Uddhav Thckarey-Sonia Gandhi

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या इच्छेप्रमाणे शिवसेनेने भाजपची साथ सोडली. पाठिंबा द्या म्हणून रोज नव्या मित्रांपुढे लोटांगण घालणे सुरू आहे; पण राष्ट्रवादी वेळ लागेल म्हणून शिवसेनेला टंगवते आहे तर सोनिया अजूनही म्हणतात, शिवसेनेची संगत नकोच!


मुंबई : राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या इच्छेप्रमाणे शिवसेनेने भाजपची साथ सोडली. पाठिंबा द्या म्हणून रोज नव्या मित्रांपुढे लोटांगण घालणे सुरू आहे; पण राष्ट्रवादी वेळ लागेल म्हणून शिवसेनेला टंगवते आहे तर सोनिया अजूनही म्हणतात, शिवसेनेची संगत नकोच !

शिवसेनेसोबत जाण्यास सोनियांची नाराजी असली तरी शरद पवार दिल्लीला जाऊन, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सोनियांचे मन वळवणार होते. दोन दिवस आधीपर्यंत चालले होते की, पवार रविवारी सोनियांशी चर्चा करतील. रविवारी ठरेल की ही चर्चा सोमवारी होईल? आता शिवसेनेचे चाणक्य संजय राऊत यांनीच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाण्याची तयारी सुरू केली आहे.

शिवसेनेचा भाजपवर घोडेबाजाराचा आरोप

दरम्यान, काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी किमान समान कार्यक्रमावर शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करणे पक्षश्रेष्ठींना मानवलेले दिसत नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तंबी दिली आहे की, सोनिया गांधी यांनी या महाआघाडीला अद्याप मंजुरी दिलेली नाही. अखेरचा निर्णय अद्याप व्हायचा आहे.