सोनिया गांधींचे जावई लवकरच राजकारणात, खुद्द रॉबर्ट वाड्रांची घोषणा

Robert-Vadra-ktHG--621x414@LiveMint

जयपूर : काँग्रेसच्या (Congress) हंगामी अध्यक्ष्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) लवकरच राजकारणात सक्रिय होणार आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यानंतर आता जावई रॉबर्ट राजकारणात आपले भाग्य आजमवणार आहेत. त्यांनी खुद्द याबाबतची ही घोषणा केली. रॉबर्ट वाड्रा हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे जावई असून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती आहेत. वाड्रा यांनी जयपूरच्या प्रसिद्ध मोती डूंगरी गणेश मंदिरात दर्शन घेतलं, त्यानंतर News 18 शी बोलताना त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली.

प्राप्तिकर विभागाने बेनामी संपत्ती प्रकरणी वाड्रा यांची यापूर्वी चौकशी केली होती. सरकारी एजन्सींचा गैरवापर होत असून प्रत्येक वेळी आपल्याला लक्ष्य केलं जातं असा आरोप त्यांनी यापूर्वी केला होता. जयपूरमध्ये गणेश मंदिरात दर्शन घेतल्यानंतरही त्यांनी या मुद्यावर मत व्यक्त केलं.

‘ईडीला जितके प्रश्न विचारयाचे आहेत, त्यावर मी उत्तर देईल. मला आता पुन्हा चौकशीला बोलवण्याचं काहीही कारण नाही. गेल्या 25 वर्षात आपण राजकारणातील प्रवेशाबाबत कधीही विचार केला नव्हता. मात्र राहुल गांधी आणि प्रियांका गांधी घराच्या बाहेर पडल्यानंतर आपला वापर केला जातो. मी आता राजकारणात येणार आहे. असं वाड्रा यांनी यावेळी स्पष्ट केलं. वाड्रा यांच्या या घोषणेनंतर सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यानंतर गांधी घराण्याशी थेट संबंध असलेली चौथी व्यक्ती आता लवकरच राजकारणात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मध्य प्रदेशमधील हिंदू महासभेचे माजी नेते आणि नथुराम गोडसे यांचा पुतळा बसवण्यात सक्रीय असलेल्या बाबूलाल चौरासिया यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यावर, ‘मला या विषयाची माहिती नाही, पण मी असतो तर गोडसेची पूजा करणाऱ्या व्यक्तीला मी राजकारणापासून दूर ठेवलं असतं,’ असं वाड्रा यांनी सांगितलं. देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही वाड्रा यांनी यावेळी भाष्य केलं. भारतामधील लोक सुशिक्षित आहेत. त्यांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. उत्तर भारत-दक्षिण भारताच्या मुद्यावरील राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचा दावा वाड्रांनी केला. गणेश मंदिरामध्ये देशवासियांच्या आरोग्याची प्रार्थना केली असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER