सोनिया गांधींचा थोरातांना फोन; महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत केली महत्त्वाची चर्चा

Balasaheb Thorat - Soniya gandhi - Maharastra Today
Balasaheb Thorat - Soniya gandhi - Maharastra Today

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी फोनद्वारे महत्त्वाची चर्चा केली आहे. थोरात यांनी स्वतः यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी आज मला फोन करून राज्यातील कोरोना परिस्थिती प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेतली.

ही बातमी पण वाचा : महाविकास आघाडीत श्रेयवादासाठी रस्सीखेच, मात्र लसीकरणासाठी मोठ्या नियोजनाची गरज!

मविआ सरकार पारदर्शकपणे कोविड परिस्थिती हाताळत असल्याबाबत समाधान व्यक्त करून अधिक काळजी घेत, वेगाने सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली.’ असे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सांगितले आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार झाला असून अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर, राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने स्थिती आटोक्यात येताना दिसत असली तरी धोका मात्र अद्याप कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button