
मुंबई :- काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लिहिलेले पत्रं म्हणजे दबावतंत्र नाही. उलट त्यांनी या पत्रात किमान समान कार्यक्रमाशी संबंधित काही मुद्दे मांडले आहेत. त्याचे स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते .
यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पत्राविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, सोनिया गांधी यांचं पत्रं हा दबाव तंत्राचा भाग नाही. सोनिया गांधी या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुख आहेत. राज्यातलं आघाडी सरकार अस्तित्वात आलं तेव्हा किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला होता. त्याविषयीचे काही मुद्दे त्यांनी पत्राद्वारे मांडले आहेत. याचा अर्थ हा दबावतंत्राचा भाग आहे, असं समजण्याचं कारण नाही, असं राऊत म्हणाले. किमान समान कार्यक्रमात दलित आणि शोषितांच्या विकासाची हमी देण्यात आली आहे. त्यावर आघाडी सरकार काम करत आहेत. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किमान समान कार्यक्रम कसा लागू होईल, याकडे लक्ष देत आहेत, असेही ते म्हणाले.
ही बातमी पण वाचा : मोहन रावले शिवसेनेतला धगधगता निखारा होता : संजय राऊत
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला