सोनिया गांधी वाढदिवस साजरा करणार नाही ; शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

Sonia Gandhi

नवी दिल्ली : दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या (Congress) हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) बुधवारी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस नेते गोविंद सिंह डोटासरा यांच्याकडून ही माहिती देण्यात आली. कोरोना आणि शेतकरी आंदोलन या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर सोनियाजी आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरतील, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता काँग्रेस आज देशभरात कृषी कायद्यांविरोधात कशाप्रकारे आंदोलन करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER