सोनिया गांधी मजुरांच्या तिकीटाचे पैसे देणार होत्या, त्याचे काय झाले ? – पियुष गोयल

Piyush Goyal

नवी दिल्ली : काँगेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी श्रमिक स्पेशल गाड्यांवरून रेल्वे खात्यावर टीका केली होती. त्यावेळी या गाड्यांचे पैसे देऊ असे सोनिया गांधी (Soniya Gandhi) म्हणाल्या होत्या. याची आठवण देऊन रेल्वेमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी – सोनिया गांधी या स्थलांतरी मजुरांच्या तिकीटाचे पैसे देणार होत्या. त्याचे काय झाले ? असा प्रश्न विचारला आहे.

राहुल गांधींनी श्रमिक स्पेशल ट्रेनबाबतच्या एका बातमीवर ट्विट केले होते. त्यात म्हटलं होतं की, सरकार आपत्तीतही नफेखोरी करत आहे. कोरोना साथीच्या काळात भारतीय रेल्वेने श्रमिक स्पेशल ट्रेनद्वार ४२८ कोटी रुपये कमावले आहेत. हे सरकार गरिबांच्या विरोधात आहे.

भाजपा नेते आणि रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी राहुलच्या ट्विटला उत्तर देताना म्हटले की – देशाला लुबाडणारेच अनुदानाला नफा म्हणू शकतात. राज्य सरकारांकडून घेतल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा रेल्वेने मजुरांसाठी चालवलेल्या गाड्यांसाठी जास्त खर्च केला आहे. सोनिया गांधी या स्थलांतरी मजुरांच्या तिकीटाचे पैसे देणार होत्या. त्याचे काय झाले? असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER