सोनिया गांधी- ममता बॅनर्जींमध्ये चर्चा; पश्चिम बंगालच्या प्रचारातून काँग्रेसची माघार

Maharashtra Today

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष पश्चिम बंगाल (West Bengal campaign)विधानसभा निवडणुकीत लागले आहे. या निवडणुकीच्या प्रचारातून आता काँग्रेसने पूर्णपणे माघार घेतली आहे. दोन टप्प्यांतील मतदान बाकी असताना काही दिवसांपूर्वीच काँग्रेस खासदार राहुल गांधी(Rahul gandhi) यांनी बंगालमध्ये एकही सभा घेणार नाही, असे जाहीर केले. देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून हा निर्णय घेण्यात आला.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) यांनी दूरध्वनीवरून यासंदर्भात चर्चा केली. पश्चिम बंगालमध्ये सहाव्या टप्प्यातील ४३ जागांसाठी गुरुवारी(आज) मतदान होत आहे. तर आणखी दोन टप्प्यांतील ६९ जागांसाठी अद्याप मतदान व्हायचे बाकी आहे. मात्र, या दोन्ही टप्प्यात काँग्रेसकडून आता फारसा प्रचार होणार नसल्याचे दिसत आहे.

सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

आज पश्चिम बंगालमध्ये सहाव्या टप्प्यातील ४३ मतदारसंघांसाठी मतदानप्रक्रिया पार पडत आहे. काही वेळापूर्वीच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मतदान होत असलेल्या ४३ मतदारसंघांमध्ये एकूण ३०६ उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व मतदारसंघांमध्ये प्रमुख लढत ही भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्येच राहणार आहे. सहाव्या टप्प्यात भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय, राहुल सिन्हा यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. तर तृणमूल काँग्रेसच्या ज्योतिप्रिय मलिक, चंद्रिमा भट्टाचार्य, राज चक्रवर्ती आणि कौसानी मुखर्जी या नेत्यांचे भवितव्य आज निश्चित होईल.

ही बातमी पण वाचा : ‘देशातील कोरोनाची दुसरी लाट मोदींची ट्रॅजेडी !’ ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button