दिल्ली हिंसाचाराची माहिती घेण्यासाठी सोनिया गांधींकडून समितीची स्थापना

Sonia Gandhi- Delhi violence

नवी दिल्ली : शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईशान्य दिल्लीतील दंगलग्रस्त भागांची भेट घेऊन तेथील परिस्थितीचा अहवाल सादर करण्यासाठी पाच सदस्यांची समिती नियुक्त केली आहे. या समितीती अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, प्रभारी शक्तीसिंह गोहिल, हरियाणा प्रदेश प्रमुख कुमारी सेलजा, माजी खासदार तारिक अन्वर आणि महिला कॉंग्रेस प्रमुख सुष्मिता देव यांचा समावेश केला आहे.

कॉंग्रेस अध्यक्षांनी राजधानी दिल्लीतील दंगलीग्रस्त भागांचा दौरा करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची समिती नियुक्त केली असून नेत्यांना दंगाग्रस्त भागांतील हिंसाचार व त्यानंतर झालेल्या परिणामांचा आढावा घेण्यास सांगितले आहे. तसेच समितीने ताबडतोब अहवाल अध्यक्षांकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे.