अर्णव गोस्वामींच्या अटकेवर सोनिया गांधी आणि पवारांनी भूमिका स्पष्ट करावी : आशिष शेलार

Sharad pawar-Sonia gandhiAshish shelar

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईवर भाजपने महाविकास आघाडीवर धारेवर धरले .

भाजपाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

इंदिरा काँग्रेसच्या आणीबाणीची शिवसेना समर्थक होती. आता शिवसेना काँग्रेसच्या आणीबाणीचे समर्थक नाही, तर व्यवस्थापक झाले आहेत, असा टोलाही आशिष शेलारांनी शिवसेनेला लगावला आहे. तसेच सोनियांची काँग्रेस आणि शरद पवारांची  (Sharad pawar)राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या विषयावर आपल्या पक्षांची भूमिका स्पष्ट करावी, असे आम्ही त्यांना आवाहन करत असल्याचेही शेलार म्हणाले आहेत.

नियती आणि कालचक्र कसं फिरत असतं हे आज स्पष्ट झालं. 74-75 च्या काळामध्ये काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीचे शिवसेना हे समर्थक होते. आज कालचक्र इतके फिरले असल्याची टीका आशिष शेलारांनी केली आहे.

आपण आजपर्यंत केलेल्या कुकृत्याला झाकण्यासाठी नाईक परिवाराची केस समोर दाखवून गेल्या काही दिवसांपूर्वी केलेल्या गोष्टी लपवता येत नाहीत. हा एक कटकारस्थानाचा भाग म्हणून महाराष्ट्र सरकारनं सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या आदेशावर उद्धव ठाकरेंच्या सरकारनं केलेली ही कारवाई आहे. जे स्वतंत्रता, संविधानाच्या गोष्टी करणारे आज मूकदर्शक बनले आहेत. त्यांचं मूक समर्थन हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला घाला घालणारं आहे. त्याचा बीमोड करणारं आहे.

सोनियांची काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या विषयावर आपल्या पक्षांची भूमिका स्पष्ट करावी, असे आम्ही त्यांना आवाहन करतो आहे, असेही आशिष शेलार म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER