सोनिया गांधी व अशोक चव्हाण यांच्या 45 मिनिटे चर्चा

नवी दिल्ली : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज दिल्लीत भेट घेतली. ही भेट औपचारिक होती. यात विशेष असी काहीही चर्चा झाली नाही. दरम्यान मधल्या काळाती त्यांची तब्येत ठिक नव्हती. अनेक दिवसांपासून त्यांची भेट झाली नव्हती, असे चव्हाण म्हणाले. सोनिया गांधी आणि चव्हाण यांच्यात 45 मिनिटे चर्चा झाली.

सर्वसामान्य माणसांचे घराचे स्वप्न साकारण्यासाठी शासन कटिबद्ध – जितेंद्र आव्हाड

बाळासाहेब यांच्या संदर्भात लिहीलेल्या पत्राबाबत विचारले असता ते म्हणाले, मी असे कुठलेही पत्र पाठवले नाही. सीएए, एनआरसी आणि एनपीआर लागू करायचे नाही ही भूमिका काँग्रेसची भूमिका आहे. मात्र महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार आहे. या तीन पक्षाची समन्वय समिती आहे. या समितीच्या बैठकीत सर्वांचे मत जाणून घेतल्यानंतरच आणि चर्चा झाल्यानंतर याबाबत निर्णय होणार असल्याचे ते म्हणाले, येत्या 24 तारखेपासून विधानसभा सत्र सुरु होत आहे. त्यावेळी हा विषय समन्वय समितीत चर्चा झाल्यानंतरच यावर योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे चव्हाण म्हणाले.