सोनावडे घाट कामात घोटाळा : आ. प्रकाश आबिटकर

Prakash Abitkar

कोल्हापूर : 116 कोटी रुपये खर्चून करण्यात येत असलेल्या गारगोटी-शिवडाव रस्त्याच्या कामात कंत्राटदार कंपनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप आ. प्रकाश आबिटकर यांनी केला. याप्रकरणी कंत्राटदार कंपनी व कन्सल्टंट यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना आ. आबिटकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरूड यांना दिल्या आहेत. आ. आबिटकर व ग्रामस्थांनी या कामाचे ऑडिट करून कंपनीच्या चुकीच्या कामाचा भांडाफोड केला.

भाजप-शिवसेना सरकारच्या काळात सुमारे 35.21 किलोमीटरचा हा रस्ता मंजूर झाला आहे. या कामासाठी 116 कोटींचे पुणे येथील कृष्णा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे टेंडर मंजूर करण्यात आले. या कंपनीने 50 टक्के काम पूर्ण केल्याचा दावा कंपनीचे इन्चार्ज करत आहेत. कंपनीच्या कामाबद्दल नागरिकांतून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन आ. आबिटकर यांनी कंपनीचे इन्चार्ज, कन्सल्टंट, बांधकाम विभागाचे अधिकारी, एक्स्पर्ट समिती यांच्या साक्षीने पंचनामाच केले असून या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी आ. अबिटकर यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER