सोनार बांगलासाठी केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार हवे – राजीव बॅनर्जी

Rajib Banerjee

नवी दिल्ली : सोनार बांगलासाठी केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार हवे असे तृणमूल काँग्रेस (Congress) सोडून भाजपात (BJP) आलेले नेते व पश्चिम बंगालचे (West Bengal) माजी वनमंत्री राजीव बॅनर्जी (Rajib Banerjee) म्हणालेत.

राजीव बॅनर्जी यांच्यासोबत काही बंडखोर आमदार आणि नेत्यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेऊन भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आज (रविवारी) अमित शाह यांच्या हावडा रॅलीत दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी होत पश्चिम बंगालच्या जनतेला त्यांनी संबोधित केले.

बॅनर्जी म्हणालेत, पश्चिम बंगालमध्ये आम्हाला डबल इंजिन असलेले सरकार हवे आहे. सोनार बांगलासाठी केंद्रात आणि राज्यात म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये भाजपाचेच सरकार असणे गरजेचे आहे.

तृणमूल कॉंग्रेस खासगी मर्यादित कंपनी

या रॅलीत सुवेंदू अधिकारी यांनीही भाग घेतला. तृणमूल काँग्रेसवर टीका करताना ते म्हणालेत, तृणमूल कॉंग्रेस आता पक्ष नसून खासगी मर्यादित कंपनी आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत ही खासगी लिमिटेड कंपनी रिकामी होईल. तिथे कोणीही उरणार नाही!

अमित शाह

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या कार्यकाळात पश्चिम बंगालची वाटचाल अधोगतीकडे झाली. ममता बॅनर्जींमुळे पश्चिम बंगाल अन्य राज्यांच्या तुलनेत मागे पडले, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.

बंगालमध्ये रामराज्य स्थापन होणार : स्मृती इराणी (Smriti Irani)

पश्चिम बंगालमध्ये रामराज्य स्थापित होणार आहे. तृणमूल काँग्रेस सत्तेतून पायउतार होणार आहे आणि भाजपा सत्तेत येणार आहे. पहिल्यांदा कोणत्या नेत्याने कट मनी स्वीकारले. हे सरकार तांदूळ आणि डाळ चोर आहे. दीदींनी कोरोना महासाथीतही महापाप केले आहे, अशी टीका स्मृती इराणी यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER