सोनम वांगचुक यांनी सैनिकांसाठी बनवला थंडीपासून संरक्षण करणारा तंबू

Sonam Wangchuk built a tent to protect the soldiers from the cold

लडाख : दैंनदिन समस्यांवर सोपे उपाय शोधणारे सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी उणे १४ डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षाही कमी तपमानात वातावरण गरम ठेवणारे तंबू तयार केले आहे. हे तंबू चीन, काश्मीरच्या सीमेवर सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी उपयोगी ठरणार आहेत.

या तंबूंना ‘सोलर हिटेड मिलेटरी टेन्ट’ नाव देण्यात आले आहे. सोशल मीडियावर या तंबूचा एक फोटो शेअर करुन वांगचुक यांनी सांगितले की, उणे १४ डिग्री सेल्सियमध्येही या तंबूत आरामात राहता येते. भारतीय जवानांसाठी या तंबूचा वापर केला तर उर्जेसाठी करण्यात येणाऱ्या केरोसीनचा वापर टाळता येतो त्यामुळे प्रदूषण बऱ्याच प्रमाणात नियंत्रित करता येईल. या तंबूचे वजन ३० किलोपेक्षा कमी आहे त्यामुळे ते सहज कुठेही हलवता येतात. एका तंबूत दहा जवान राहू शकतात. यामुळे कार्बनचे उत्सर्जन करणार नाही.

सोनम वांगचुक स्‍टूडंट्स एज्युकेशनल अॅन्ड कल्‍चरल मू्व्हमेंट्स ऑफ लद्दाख (SECMOL) या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करत आहेत. लडाखमधील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी म्हणून त्यांनी आईस स्तूपचा शोध लावला. त्यांच्या या शोधाची सर्वत्र प्रशंसा झाली. ‘थ्री इडियट्स’ या गाजलेल्या चित्रपटाची कथा सोनम वांगचुक यांच्या शैक्षणिक प्रयोगांवर आधारित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER