सोनम कपूरने 39 दिवसात पूर्ण केले सिनेमाचे शूटिंग

blind

अनिल कपूरची मुलगी सोनम कपूरने (Sonam Kapoor) बॉलिवूडमध्ये कमी सिनेमे केले पण चांगले यश मिळवले आहे. ती स्वतः एक चांगली फॅशन डिझाइनर असून स्वतःचे कपडे स्वतःच डिझाईन करते. यशाच्या शिखरावर असतानाच सोनमने लग्न केले आणि संसाराला लागली. मात्र ती अधून मधून सिनेमात काम करतानाही दिसते. लॉकडाऊनमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेल्या ‘एके व्हर्सेस एके’मध्ये सोनम कपूर वडील अनिल कपूर, भाऊ हर्षवर्धनसोबत दिसली होती. या सिनेमात तिने अभिनेत्री सोनमचीच भूमिका साकारली होती. लॉकडाऊनमध्येच सोनम कपूरने एक सिनेमा साईन केला होता आणि लॉकडाऊननंतर सरकारने शूटिंगची परवानगी देताच सोनमने या सिनेमाचे केवळ 39 दिवसात शूटिंग पूर्ण ( shooting completed )केले आहे.

दिग्दर्शक शोम मखिजाने सोनम कपूरला ‘ब्लाईंड’ सिनेमासाठी साईन केले होते. हा सिनेमा एका कोरियन सिनेमाची हिंदी रिमेक आहे. शूटिंगची परवानगी मिळताच संपूर्ण यूनिट स्कॉटलँडमधील ग्लासगो फिल्मसिटीत शूटिंग करण्यास रवाना झाले होते. यूनिटने 39 दिवसात सिनेमाचे संपूर्ण शूटिंग पूर्ण केले आहे. सोनम या सिनेमात एका आंधळ्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारीत आहे. पोलीस ट्रेनिंग घेऊन कामावर रुजू होण्यापूर्वीच काही कारणाने सोनमचे डोळे जातात. डोळे गेले असले तरी तिच्या शरीरातील अन्य इंद्रिये जास्त शक्तीशाली होतात. त्याच्या मदतीने सोनम एका गुन्ह्याचा कसा शोध लावते त्याची कथा म्हणचे हा सिनेमा. या सिनेमाची निर्मिती प्रख्यात निर्माता सुजॉय घोष करीत आहे. सिनेमात सोनमसोबत विनय पाठक, पूरब कोहली आणि लिलियेट दुबेही दिसणार आहेत. सिनेमा पूर्ण झाला असला तरी त्याच्या पोस्ट प्रॉ़डक्शनला वेळ लागणार असल्याने या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER