सोनम कपूर पुन्हा कपड्यांमुळे झाली ट्रोल

Maharashtra Today

बॉलिवूडमध्ये (Bollywood) सोनम कपूर (Sonam Kapoor) ही फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाते. ती फॅशन डिझायनरकडून तिचे कपडे तयार करून न घेता स्वतःच तयार करीत असते आणि विविध समारंभामध्ये वापरत असते. मात्र तिने डिझाईन केलेले कपडे विचित्र किंवा अनेकदा खूप वेगळे असतात. तिच्या वेगळ्या फॅशनमुळे ती नेहमी चर्चेत असते आणि त्यामुळेच ती तिच्या कपड्यांमुळे ट्रोलही झालेली आहे. मात्र ट्रोलर्सकडे ती लक्ष न देता आपले काम करीत असते. मी ट्रोलर्सकडे लक्ष देत नाही असे तिने मागे म्हटले होते. आताही तिने विचित्र असा ड्रेस घालून फोटोशूट केल्याने चांगलीच ट्रोल झाली आहे. अशा प्रकारचे कपडे कोणी घालते का? हे कोणते डिझाईन आहे आंटी असे प्रश्न यूझर्सने सोनमला विचारले आहेत.

Sonam Kapoor wore a strange dress, Trolls put the class, said - which design is the aunt - AtZ Newsसोनम कपूरने ‘हार्पर्स बाजार इंडिया मॅगझीन’ (Harper’s Bazaar India) साठी नुकतेच एक विशेष फोटोशूट केले. मॅगझिनच्या १२ व्या अॅनिव्हर्सरीनिमित्त हे फोटोशूट करण्यात आले होते. यापैकी एक फोटो या मॅगझिनच्या कव्हरवर छापण्यात आला आहे, सोनमने या फोटोशूटमधील काही फोटो आणि मॅगझिनचे कव्हर सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले. या फोटोंमध्ये सोनम सेक्सी दिसण्याचा प्रयत्न करीत आहे. फोटोमध्ये तिने ब्लॅक अॅन्ड व्हाइट रंगाचा सिल्क डजेस सॅटिन ड्रेस आणि ट्राउझर्स घातलेले दिसत आहे. एवढेच नव्हे तर तिने डोळयांवर विचित्र डिझाईनचा गॉगलही घातलेला दिसत आहे. फोटोसाठी तिने पोझही बोल्ड पद्धतीने दिली आहे. सोनमने या फोटोशूटमधील काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो काही जणांना आवडले असले तरी अनेकांनी यावरून तिची चांगलीच टेर उडवत तिला ट्रोल केले आहे. काही जणांनी तर सोनमने काय घातले आहे तेच समजत नाही असेही म्हटले आहे.

सोनमच्या फोटोंवर कमेंट करताना एका यूझरने लिहिले आहे, हे कोणते डिझाईन आहे आंटी? तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे, हे काय कबूतर बनली आहेस? तर एका यूझरने व्हल्गर म्हटले आहे तर एकाने असे कपडे कोणी घालते का छी अशी प्रतिक्रिया दिली आहे. एकाने देखो वो जिंदा है, तर आणखी एकाने ये क्या बदतमीजी है अशी कमेंट केली आहे.

ही बातमी पण वाचा : आलिया भट्टलाही झाली कोरोनाची लागण, ‘गंगुबाई काठियावाड़ी’चे शूटिंग थांबले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button