राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची पत्नी थेट कामवाल्या बाईंच्या घरात चुलीवर स्वयंपाक करते!

Sonali Tanpure

मुंबई : मंत्री म्हटलं किंवा मंत्र्याचं कुटुंब म्हटलं की मोठेपणा… बडेजाव… सगळा कार्यक्रम अगदी कसा थाटात आणि नियोजित असतो. पण या सगळ्याला तनपुरे कुटुंब अपवाद आहेत. वागण्या-बोलण्यात असलेला गोडवा आणि सर्वसामान्यांची जुळालेली नाळ तनपुरे कुटुंबाला आणखीनच मोठं करते. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्या पत्नी सोनाली तनपुरे (Sonali Tanpure) यांनी आपण मंत्र्याची बायको आहोत हे विसरुन त्यांच्या घरच्या कामवाल्या बाईंच्या घरी जाऊन चुलीवर स्वयंपाक केला. त्यांच्या या साधेपणाची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.

सोनाली तनपुरे यांनी ट्विटरवर एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून आमच्या घरी काम करणाऱ्या संगीता वेताळ यांच्या घरी जाऊन आज चुलीवर जेवण बनवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच अचानकपणे हे दृश्य पाहणाऱ्या मंत्री प्राजक्त यांनाही धक्का बसल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सोनाली तनपुरे यांनी कामवाल्या बाईंच्या घरी जाऊन चुलीवर स्वयंपाक केला. आपल्या घरात काम करते म्हणून काय झालं, शेवटी त्यांच्याही कामाला मोल आहेच की… आणि त्यांनाही आपल्या समान वागवलं पाहिजे, अशी त्यापाठीमागची भावना…!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER