सोनाली पोहोचली भलतीकडेच

Sonali Khare

कलाकारांच्या आयुष्यात अनेक गमतीचे प्रसंग घडत असतात. कधी अनाहूतपणे त्यांची फजिती होते तर कधी आ बैल मुझे मार म्हणत कलाकार नसती आफत ओढवून घेत असतात. अभिनेत्री सोनाली खरे (Sonali Khare) हाँगकाँगला फिरायला गेली असताना अशा ठिकाणी जाऊन पोहोचली की तिथून बाहेर येत असताना तिच्याकडे बघणाऱ्या अनेक नजरा रोखल्या होत्या. आता तुम्ही म्हणाल मराठी सिनेमा, मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री थेट हॉंगकॉंग मध्ये इतकी प्रसिद्ध आहे की काय की तिथे ती पर्यटनासाठी गेली असताना तिला बघून अनेक जण जागच्याजागी खिळले. तर असं नाही पण हा, सोनाली ज्या ठिकाणाहून बाहेर आली ते बघता सगळ्यांनाच आश्चर्य वाटणं स्वाभाविक होतं. सोनाली अशा कुठल्या ठिकाणाहून बाहेर पडली हे तिने एका खास मुलाखतीमध्ये जाहीरपणे कबूल केलं. आणि ती त्या ठिकाणी का गेली होती हे सांगायलाही ती विसरली नाही.

आज काय स्पेशल या शोचे निवेदन सध्या सोनाली खरे करत आहे. बऱ्याच वर्षानंतर किंबहुना बऱ्याच वर्षांच्या विश्रांतीनंतर सोनाली पुन्हा एकदा कॅमेरासमोर आलेली आहेत. या वेळेला तिने मालिका किंवा सिनेमा या माध्यमाची निवड केली नसून छोट्या पडद्यावरच्या आज काय स्पेशल या रेसिपी शोमध्ये सेलिब्रिटी कलाकारांना बोलवून त्यांच्या आवडत्या रेसिपी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा दुवा बनत आहे. सावरखेड एक गाव हा सिनेमा असो किंवा बे दुणे दहा ही मालिका असो, सोनालीने तिच्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांचा खास वर्ग तयार केला आहे. आठ ते दहा वर्षापासून सोनाली तिच्या मुलीच्या संगोपनासाठी कॅमेरापासून लांब होती. या काळात तिच्या वेगवेगळ्या कला सुरू होत्या. लॉकडाऊन काळात सोनालीने तिच्या मुलीसोबत वेगवेगळ्या रेसिपीचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले होते. लवकरच तिची मुलगीही अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहे.

स्वप्निल जोशी याच्या नंबर वन यारी या विशेष शोमध्ये सोनाली तिची सख्खी मैत्रीण अमृता खानविलकरसोबत सहभागी झाली होती. या शोमध्ये असे काही प्रश्न या दोघींसमोर मांडण्यात आले की त्यातून एकेक किस्से बाहेर आले. त्यामध्ये एक प्रश्न असा होता की कधी चुकून पुरुषांच्या स्वच्छतागृहात जाण्याची वेळ आली आहे का ? यावर या दोघींचही उत्तर नाही असेल या अपेक्षेत असलेल्या प्रेक्षकांसमोर या दोघींनीही होय असे उत्तर सांगितलं. त्यातले सोनालीने त्यामागचे कारण सांगितल्यानंतर प्रेक्षकांना हसता हसता पुरेवाट झाली. पर्यटक म्हणून हाँगकाँगला गेलेल्या सोनालीने थेट पुरुषांच्या स्वच्छतागृहात जाण्याचा खळबळजनक प्रकार केला होता. याबाबत खुलासा करताना सोनालीने सांगितलं की, एकदा मी हाँगकाँगला फिरायला गेले होते आणि तिथे मला कळालं की एका हॉटेलमध्ये एक असं पुरुषांचं स्वच्छतागृह आहे की ज्याचं फ्लोरिंग हे काचेचे आहे. त्या मधून त्या हॉटेलचा सगळा इंटरनल व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. हे ऐकल्यानंतर ते स्वच्छतागृह कसं असेल हे पाहण्याचा मोह मला आवरला नाही. माहिती घेतल्यानंतर मला असं कळलं की तो ग्लास व्ह्यू स्त्रियांच्या स्वच्छतागृह मधून दिसत नाही तर फक्त पुरुषांच्या स्वच्छतागृहासाठी ते खास डिझाईन केलं आहे. मग मी वेळ काढून त्या हॉटेलपर्यंत पोहोचले आणि शोधत ते पुरुषांचे स्वच्छतागृह गाठलं. थेट आत घुसले. खरंच मी जे ऐकलं होतं त्याप्रमाणे तो ग्लास व्ह्यू होता आणि त्यातून त्या हॉटेलच्या खालच्या मजल्यापर्यंत नजारा दिसत होता. अर्थात स्वच्छता गृहातील जी वेटिंग लोबी होती त्यामध्ये ग्लास फ्लोरिंग केलं होतं ते पाहून मला खरंच खूप आनंद झाला आणि अशा पद्धतीची आर्किटेक्चर रचना बघून मला मस्त वाटलं. अर्थात मी जेव्हा आत गेले तेव्हा आत कोणीही पुरुष नाहीत याची खात्री केली होती. चुकून मी पुरुषांच्या स्वच्छतागृहात गेले असे म्हणता येणार नाही तर मी जाणून बुजून पुरुषांच्या स्वच्छतागृहात गेले होते पण त्यामागे माझी भावना ही एक पर्यटक म्हणून होती आणि मला ते ग्लास फ्लोअरिंग बघायचं होतं.

सोनालीने सांगितलेला हा किस्सा अर्थातच सोशल मीडिया वर व्हायरल झालेला आहे. स्वप्निल जोशीने घेतलेल्या या मुलाखतीचे काही भाग यूट्यूब चैनल वर असल्यामुळे ज्यांनी ही मुलाखत पाहिली त्यांनी नंतर सोनालीला मेसेज करून भंडावून सोडलं होतं. सोनालीने हा किस्सा एक गंमत म्हणून शेअर केला. पण खरचं अनेकदा आपण सिनेमांमध्ये किंवा मालिकांमध्ये असं बघतो की काही महिला पुरुषांच्या स्वच्छतागृहात जातात किंवा पुरुष महिलांच्या स्वच्छतागृहात जातात. पुरुष स्त्री पात्र करत असतात तेव्हा तर हमखास सिनेमांमध्ये हा सीन प्रेक्षकांना पाहायला मिळत असतो. पण सोनाली खरे ही वैयक्तिक आयुष्यामध्ये जेव्हा पुरुषांच्या स्वच्छतागृहांमध्ये जाते ती त्या स्वच्छतागृहाचं इंटेरियर डिझाईन पाहण्यासाठी हे ऐकून तिचे तिच्या चाहत्यांनी मात्र तिला सलाम केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER