सोनाली अडकणार लग्नबंधनात? इन्स्टाग्रामवरून दिली माहिती

Sonali kulkarni

मुंबई :- ‘हिरकणी’ या ऐतिहासिक चित्रपटातून रसिक-प्रेक्षकांची वाहवा मिळवलेली सोनाली कुलकर्णी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. इन्स्टाग्रामवरून एक व्हिडीओ पोस्ट करून तिनेच ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली. कुणाल बेनोडेकर असं तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव असून या वर्षी या दोघांच्या लग्नाचा बार उडणार असल्याच्या चर्चा सिनेवर्तुळात रंगल्या आहेत.

इन्स्टाग्रामवरून व्हिडीओ पोस्ट करून तिने म्हटले आहे की, ‘माझ्या जोडीदारासोबत मी एका नवीन प्रवासाला सुरुवात करतेय. चढ-उतार आणि साहसासाठी आम्ही सज्ज आहोत.’ सध्या सोनाली दुबईत कुणालसोबत सुटीचा आनंद घेत आहे.

कुणाल हा व्यवसायाने चार्टर्ड अंकाउंटंट असल्याचं सांगण्यात येत आहे. लवकरच सोनालीचा ‘झिम्मा’  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.