अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा दुबईत पार पडला साखरपुडा !

मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतली ‘अप्सरा ‘ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे . उद्योगपती कुणाल बोनोडेकर याच्याशी तिचा साखरपुडा झाल्याचं सांगितलं आहे. घरातल्या सगळ्या लोकांशी उपस्थित हा सोहळा दुबाईमध्ये पार पडला.

सौंदर्य, नृत्यकौशल्य आणि अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं तिच्या आयुष्यातील अत्यंत खास अशा वळयणाची माहिती चाहत्यांना दिली आहे.

‘आमचा ०२.०२.२०२० ला साखरपुडा झाला, आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं… आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या…’, अशा कॅप्शनसह तिनं हे फोटो पोस्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला