लंडनच्या थंडीत सोनाली हेमंतचा डान्स

Sonalee Kulkarni

सेलिब्रिटी कलाकार चित्रीकरणाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी फिरत असतात. देशात-परदेशात जेव्हा त्यांच्या चित्रीकरणाचे शेड्युल असते तेव्हा काम झाल्यानंतर त्यांची धमालमस्ती सुरु असते. शिवाय पर्यटन, खवय्येगिरी करत कलाकार त्यांचा हा फ्री टाईम एन्जॉय करत असतात. सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता हेमंत ढोमे लंडनमध्ये चित्रीकरणासाठी गेले असून लंडनच्या प्रचंड थंडीत त्यांनी केलेला जरा सा झूम लू या गाण्यावर चा डान्स प्रचंड व्हायरल होत आहे. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या सिनेमातील काजोल आणि शाहरुख खान यांच्यावर चित्रित झालेल्या जरा सा झूम लू या गाण्यावर सोनाली काजल स्टाइल डान्स करताना दिसत असून हेमंत मात्र थंडीने चांगलाच गारठलेला आहे. या धमाल डान्स वर सोनाली आणि हेमंत चे चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.

थ्री चिअर्स या सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली होती. मात्र लॉक डाऊन मुळे परदेशातील प्रवास बंद असल्यामुळे या सिनेमाचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आलं होतं. अभिनेता लोकेश गुप्ते यांनी दिग्दर्शित केलेला हा तिसरा सिनेमा लवकरच पडद्यावर झळकणार आहे. सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही डान्सिंग क्वीन या रियालिटी शोचे परीक्षण करताना आपल्याला दिसत आहे. तसेच ती चित्रीकरण मध्येदेखील व्यस्त आहे. सोनालीचे लग्न ठरले असून ती लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. लंडनचा उद्योजक असलेल्या कुणाल बेनोडेकर याच्यासोबत तिचे लग्न ठरलं आहे. मात्र तिचा होणारा नवरा सध्या दुबईत असल्याने ती गेल्या महिन्यामध्ये दुबईला त्याला भेटण्यासाठी गेली होती. तिथे देखील तिने वेगवेगळे कार्यक्रम केले त्याचे फोटो, व्हिडिओ शेअर केले होते. दुबईवरून परतल्यानंतर सोनालीने मुंबईत तिच्या नवऱ्याची भेट सगळ्या मित्रमंडळींना करून दिली. आणि त्यानंतर डान्सिंग क्वीन या शोच्या परीक्षकपदाची जबाबदारी तिच्याकडे आल्यानंतर ती त्या कार्यक्रमात व्यस्त होती. सध्या मात्र ती लंडनच्या थंडीचा अनुभव घेत आहे.

हेमंत ढोमे हा अभिनेता दिग्दर्शक यासोबत एक चांगला लेखकही आहे. बघतोस काय मुजरा कर, पोस्टर गर्ल यासह अनेक सिनेमात त्याने अभिनयाची चुणूक दाखवली आहे. वेगवेगळ्या नाटकांसाठी देखील तो लेखन करत असतो .

सिनेमाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने लंडन भटकंतीवर असलेल्या सोनाली आणि हेमंत चा सध्याचा व्हिडीओ मात्र चांगलाच गाजत आहे. या व्हिडिओमध्ये सोनालीचे सौंदर्य ब्राऊन रंगाच्या लॉंग कोट मध्ये चांगलेच खुलून आले आहे. हेमंतने व्हाईट शर्ट आणि ब्लॅक कोट घातला आहे. या गाण्यामध्ये त्यांनी एक कॉमेडी पंच देखील मारला आहे. हे गाणं बघत असताना आपल्याला दिसून येईल सोनाली प्रचंड एनर्जेटिक अदाकारी करत हेमंतला छेडण्याचा प्रयत्न या गाण्यात करत आहे, तर हेमंत मात्र एकाजागी थंडीने कुडकुडत उभा आहे. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या सिनेमातलं हे गाणं उडत्या चालीचं आहे. आणि त्यातला वेडेपणा सोनाली आणि हेमंतने चांगलाच पकडला आहे.

थ्री चिअर्स हा सिनेमा राजकारणाच्या वातावरणावर आधारित आहे. या सिनेमासाठी लंडनमध्ये चित्रीकरण होत आहे त्याच्यासाठी सोनाली आणि हेमंत हे दोघेही उत्सुक होते . दोघांनाही लंडनमध्ये सिनेमाचं शूट करताना जितकी मजा आली तितकीच अशा प्रकारची धमाल मस्ती आणि व्हिडिओ करतानादेखील आल्याचे दोघांनी सांगितले. या व्हिडिओ बरोबरच लंडनमधल्या फ्री टाईम मधले अनेक फोटो देखील दोघांनी आपल्या पेज वर शेअर केले आहेत .

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER