नितेश राणेंना धक्का ; सोनाळी ग्रामपंचायत शिवसेनेने जिंकली

Nitesh Rane-uddhav thackeray

सिंधुदुर्ग :- भाजप (BJP) नेते नितेश राणेंच्या (Nitesh Rane) मतदारसंघातील वैभववाडी तालुक्यातील सोनाळी ग्रामपंचायतीवर परिवर्तन घडून आले आहे सात पैकी पाच सदस्य शिवसेनेचे (Shivsena) निवडून आल्याची माहिती आहे.राज्यातील 12 हजाराहून अधिक ग्रामपंचायतींचा निकाल हाती येत आहे. त्यात सत्ताधारी शिवसेनेची विजयी घौडदौड सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यापाठोपाठ विरोधी पक्ष असलेला भाजपलाही अनेक ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

आज जसेजसे निकाल हाती येत आहेत, तसं शिवसेनेच्या वर्चस्वाखालील ग्रामपंचायतींची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. आज मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर हातकणंगले मतदारसंघातील मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा पहिला भगवा फडकल्याचे दिसून आले.

ही बातमी पण वाचा : ‘शिवसेनेची विजयी घोडदौड म्हणजे जनतेकडून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER