सोनाक्षी सिन्हाही ओटीटी प्लॅटफॉर्मवर

Sonakshi Sinha

अभिषेक बच्चन (Amitabh Bachchan), सैफ अली (Saif Ali Khan), आर. माधवन (R. Madhavan) अशा मोठ्या कलाकारांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचे (OTT Platform) महत्व लक्षात घेऊन वेबसीरीजमध्ये काम केले होते आणि आताही करीत आहेत. मात्र या कलाकारांनी अनेक वर्ष चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर आगमन केले होते. या यादीत आता प्रख्यात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचेही (Sonakshi Sinha) नाव जोडले जाणार आहे. सोनाक्षी बॉलिवूडमध्ये अजूनही नायिकांची कामे करीत आहे आणि तिच्याकडे काही चित्रपट आहेत. तरीही सोनाक्षीने या नव्या माध्यमाकडे आपले लक्ष वळवले आहे.

हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लि. चित्रपटातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरलेल्या रीमाने नंतर तलाश, गोल्ड या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले आहे. आता रीमा कागती फॉलन नावाची एक वेबसीरीज तयार करीत आहे. या वेबसीरीजसाठी सोनाक्षी सिन्हाला साईन करण्यात आले असून लवकरच याचे शूटिंग सुरु केले जाणार आहे. ‍रीमा कागती स्टार्ट टू फिनिश शेड्यूल तयार करून वेबसीरीजचे शूटिंग पूर्ण करणार आहे. जानेवारी 2021 मध्ये राजस्थानमध्ये याचे शूटिंग सुरु होईल. ही वेबसीरीज एक क्राईम थ्रिलर असून सोनाक्षी सिन्हा यात पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. एका झालेल्या हत्येचा ती कसा तपास करते आणि खऱ्या खुन्याला कशी शोधून काढते ते या वेबसीरीजमध्ये दाखवले जाणार आहे. सोनाक्षीसोबत या वेबसीरीजमध्ये तुंबाड फेम सोहम शाह, गुलशन देवैया, विजय वर्माही महत्वाच्या भूमिका साकारीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER