वडिलांच्या विजयासाठी पुत्रही प्रचारात

औरंगाबाद : मध्य विधानसभा मतदार संघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार प्रदिप जैस्वाल यंाच्या विजयासाठी त्यांचे चिरंजीव व युवासेनेचे पदाधिकारी ऋषिकेश जैस्वाल देखील प्रचारयात्रेत मग्न आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापासून प्रचाराची यंत्रणा राबवण्याच्या प्रत्येक गोष्टीत सुरूवातीपासूनच ऋषिकेश जैस्वाल बारकाईने लक्ष देत आहेत. प्रत्यक्ष प्रचारात सहभागी होऊन वडिलांसाठी ते मतदारांना आवाहन करत आहेत.

ऋषिकेश जैस्वाल यांनी युवासेना आणि शिवसेनेतील तरूण कार्याकर्त्यांना सोबत घेऊन प्रचाराची धुरा संभाळली आहे. तरूण आणि नवमतदारांवर लक्ष केंद्रित करत ऋषिकेश जैस्वाल यांनी शहराच्या विविध भागात प्रचार सुरू केला आहे. युवासेनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय असलेल्या ऋषिकेश जैस्वाल यांनी यापूर्वी दोन निवडणुकात देखील प्रचार केला होता. कमीवेळात मतदारसंघातील अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचता यावे यासाठी ऋषिकेश स्वतंत्रपणे पदयात्रा काढून प्रचार करत आहेत.