भालकेंच्या जागी पोटनिवडणुकीत मुलगा की पत्नी? अजितदादा-जयंत पाटील पंढरपुरात घेणार निर्णय

who-will-become-dcm-jayant-patil-or-ajit-pawar

सोलापूर : पोटनिवडणुकीच्या तोंडावर पंढरपुरात राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे . त्यामुळे पक्षातील वाद मिटवण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या पंढरपुरात येणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांच्या मुलाला तिकीट देण्यास काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. त्यामुळे आता भालकेंच्या पत्नीच्या उमेदवारीचीही चाचपणी होत आहे.

आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर 17 एप्रिल रोजी पंढरपुरात पोटनिवडणूक होत आहे. भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र राष्ट्रवादीच्याच काही पदाधिकाऱ्यांनी भगीरथ भालके यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने वाद निर्माण झाला.

राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विजय देशमुख यांच्या निवडीवरुन राष्ट्रवादीत ठिणगी उडाली. युवराज पाटील यांनी बंडाचा झेंडा उभारत त्यांच्या उमेदवारीला आव्हान दिले. युवराज पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या बंडाची दखल थेट पक्षाने घेतली.

अंतर्गत हात मिटविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या पंढरपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी देण्याबाबत देखील चर्चा होणार आहे. अंतर्गत वाद मिटल्यानंतरच राष्ट्रवादीकडून उमेदवारीची घोषणा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER