”उद्धव बेटा, मला तुला भेटायचे आहे” ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शिक्षिकेची आर्त हाक

CM Uddhav Thackeray & Teacher - Maharashtra Today

मुंबई : मुंबईत आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका अनेकांना बसला आहे . या चक्रीवादळामुळे वृद्धाश्रमाचे छप्पर उडाले. यात न्यू लाइफ फाऊंडेशनच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीचं पॅनेल कोसळून एक ज्येष्ठ नागरिक जखमीही झाला. या वृद्धाश्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे शिक्षकही आहेत. त्यापैकीच एका शिक्षकानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वृद्धाश्रम व्यवस्थित करण्याची विनंती केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे यांनी वृद्धाश्रमाचं काम करावे अशी विनंती केली आहे. 88 वर्षांच्या सुमन लक्ष्मीकांत रणदिवे या दादर येथील बालमोहन विद्यामंदिर या शाळेतून 1991 साली निवृत्त झाल्या. त्या मुलांना गणित आणि विज्ञान हे विषय शिकवायच्या .

एका वृत्तपत्राशी बोलताना रणदिवे यांनी म्हटलं की, या चक्रीवादळामुळे आमच्या वृद्धाश्रमाचे छप्पर उडाले आहे. आम्ही सगळे वृद्ध असल्यामुळे रात्री झोपायला खूप त्रास होत आहे. मच्छरही खूप चावतात. उद्धव बेटा, मला तुला भेटायचे आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असताना मी तुला शिकवले होते. इथली परिस्थिती खूप खराब झाली आहे. कृपया आम्हाला मदत कर, अशी विनंती मुख्यमंत्र्यांच्या शिक्षकेनं त्यांच्याकडे केली आहे.

गेल्या वर्षी रणदिवे या वृद्धाश्रमात आल्याचं राजेश मोरु यांनी सांगितलं. त्यांच्या पतीचं 2014 साली निधन झालं. माझ्या मुलाचं वयाच्या पहिल्या वर्षी निधन झाले , असे रणदिवेंनी सांगितले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button