
बॉलिवूडमध्ये सलमान खान (Salman Khan) यशस्वी अभिनेता तर आहेच, तो एक यशस्वी निर्माताही आहे. पन्नाशीनंतरही त्याच्यावर प्रेम करणाऱ्या फॅन्सची संख्या कमी झालेली नाही. उलट दिवसेंदिवस त्याच्या फॅन्सच्या संख्येत वाढच होत आहे. त्याच्या फॅन्समध्ये मुलींची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र सलमानवर मरणाऱ्या मुली आताच आहेत असे नाही तर मैंने प्यार किया या सिनेमापासून त्याच्या महिला फॅन्सची संख्या वाढू लागलेली आहे. सलमानचा हाच सिनेमा पाहून केवळ त्याच्याशी लग्न करण्यासाठी मियामीत राहाणारी एक पाकिस्तानी मुलगी घरच्यांना खोटे कारण सांगून भारतात आली होती. येथे येऊन ती सिनेमात काम करू लागली आणि सलमानसोबत डेटिंगही करू लागली होती. पण दुर्देवाने या दोघांचे लग्न होऊ शकले नाही. सलमाननेही अजून लग्न केलेले नाही तर या नायिकेनेही अजून लग्न केलेले नाही. तुमची उत्सुकता जास्त न ताणता त्या नायिकेचे नाव सांगून टाकतो. ती नायिका आहे सोमी अली.
बऱ्याच वर्षानंतर सोमी अलीने (Somi Ali) मुलाखत देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. सोनी अली मूळची पाकिस्तानी परंतु नंतर ती मियामीत राहात होती. सोमीने सांगितले, सलमान खानचा ‘मैंने प्यार किया’ सिनेमा पाहिल्यानंतर त्याच्याशी लग्न करण्याचा मी निर्णय घेतला. आईला ही गोष्ट सांगून मी उद्या भारतात जाणार असल्याचे सांगितले तेव्हा मी फक्त 16 वर्षांची होती. आईला माझे बोलणे ऐकून धक्काच बसला. तिने मला एका रुममध्ये कोंडून ठेवले. त्यानंतर मी वडिलांना सांगितले की, मला भारतात जाऊन नातेवाईकांना भेटायचे आणि आणि ताजमहालही पाहायचा आहे. वडिलांनी परवानगी दिल्यानंतर मियामीहून मी मुंबईला आले. येथे आल्यानंतर मी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहू लागली होते. सलमानला भेटायचे तर सिनेमाच्या माध्यमातून भेट होईल हे लक्षात आल्याने मी फोटो शूट केले आणि निर्मात्यांकडे काम मागण्यास जाऊ लागले. जवळ जवळ एक वर्षानंतर सलमानची आणि माझी भेट झाली आणि आम्ही दोघे डेटिंग करू लागलो. मला खूप आनंद झाला होता. पण 1999 मध्ये आमचा ब्रेकअप झाला. मला तसेही बॉलिवूडमध्ये करिअर करायचे नव्हते त्यामुळे पुढील शिक्षणासाठी मी अमेरिकेत गेली. मात्र या काळात मी बॉलिवूडचे काही सिनेमे सैफ अली आणि सुनील शेट्टी, चंकी पांडेसोबत केले. हे दोघेही माझे खूप चांगले मित्र होते आणि आहेत. मी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहात असल्याने निर्माते मला सिनेमात घेण्यात कचरत असत असेही सोमी अलीने या मुलाखतीत सांगितले आहे.
सोमी अली सध्या मियामीत असून तेथे ती बिझनेस करते. गेल्या काही वर्षात सलमानशी बोलणेच झालेले नाही असे सांगून सोमीने, सलमानची आई सलमा काही वर्षांपूर्वी मियामीला आली होती तेव्हा त्यांच्याशी बोलणे झाले होते अशी आठवणही सांगितली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला