कधी कधी काही माणस जास्तच बोलतात …, राष्ट्रवादीचा रामदास आठवलेंना टोमणा

Ramdas Athawale

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) भाजपप्रणित एनडीएसोबत येवून सरकार बनवावे, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला होता. यावर राष्ट्रवादीचे महेश तपासे याईन आहटवले याना टोमणा मारला – कधी कधी काही माणस जास्तच बोलतात, नुसती कविता करण्यात व्यस्त असतात. केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) हे एक आहेत.

तपासे म्हणाले की अशी माणस, ज्या वर्गाच्या हिताचे संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारने दिली त्याला बगल देऊन नुसती कविता करण्यात व्यस्त असतात. फुकटची प्रसिद्धी कशी मिळेल, मग ते कारण काहीही असो त्याच प्रयत्नात असतात.

मोदी सरकार हळूहळू सर्व सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करत असताना त्या कंपनीतील उपेक्षित वर्गाच्या कामगार, कर्मचारी यांच्या हिताच्या संरक्षणासाठी आपले मंत्रालय काय करत आहे? असा प्रश्न त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना विचारला.

कोरोना व त्यानंतर निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे उद्ध्वस्त झालेल्या मागास समाजातील उद्योजक, अल्पभूधारक शेतकरी या वर्गातील लोकांसाठी आपण फक्त कविताच केली का, असा प्रश्न महेश तपासे यांनी आठवले यांना विचारला.

आठवलेंचा सल्ला
शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शरद पवारांनी केंद्र सरकारसोबत यावे. पवार सोबत आल्यास राष्ट्रवादीला सत्तेतही वाटा मिळेल, , असे रामदास आठवले म्हणाले होते. राज्य सरकारमधील पक्षांमध्ये नाराजी आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘रेड सिग्नल’ दिला. त्यामुळे राष्ट्रवादी नाराज होती. कोरोना काळात काही निर्णय घेण्यात आले. त्या प्रक्रियेत स्थान देण्यात आले नाही, अशी काँग्रेसची तक्रार होती, याकडे आठवलेंनी लक्ष वेधले.

मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपाची (BJP) युती तुटली. त्यावरही आठवलेंनी तोडगा सुचवला. ‘उद्धव ठाकरे जवळपास एका वर्षापासून मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आणखी एखाद वर्ष मुख्यमंत्री राहाव. त्यानंतरची तीन वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील. ‘भाजपासोबत आल्यावर सर्वाधिक फायदा शिवसेनेलाच होईल. त्यांना केंद्रातही एक-दोन मंत्रिपदं मिळतील, असे आठवले म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER