कपिल देव यांना कुणी विचारले होते, क्रिकेट खेलता है पर करता क्या है?

Kapil Dev

कपिल देव (Kapil Dev) …ह्या नावातच जादू आहे. त्यांच्याबद्दल अजूनही लोकांना एवढे प्रेम आहे आणि ते एवढे लोकप्रिय आहेत की त्यांच्याबद्दल लोकांना अधिकाधिक जाणून घ्यायला आवडते. अलीकडेच त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला आणि त्यांच्यावर अँजिओप्लास्टि (Angioplasty) करण्यात आली तेंव्हा त्यांच्या लोकप्रियतेचा प्रत्यय आला. सोशल मीडियावर कपिल ‘पाजी’ यांना शुभेच्छांचा जणू महापूरच आला आणि कपिल यांनीसुध्दा त्याच्या उत्तरात धन्यवादाचा आणि नंतर दिवाळी शुभेच्छांचा व्हिडिओ पोस्ट करुन आपली विनम्रतासुध्दा दाखवून दिली.

अलीकडेच कपिल देव यांनी अभिनेत्री नेहा धुपियाच्या (Neha Dhupia) ‘नो फिल्टर नेहा’ या टाॕक शोमध्ये आपल्या खासगी आयुष्याच्या आणि आपल्या लग्नाबद्दलच्या आठवणी सांगितल्या.

त्यात ते त्यांच्या तारुण्याच्या काळात मुलींमध्ये फार लोकप्रिय होते हा गैरसमज असल्याचे सांगितले. ते म्हणाले की मी लेडीज मॕन वगैरे काही नव्हतो. उलट मला तर सारखे वाटत रहायचे की, यार, सब लडकीयां बाकी प्लेयर्स की तरफ देखती है, हमारी तरफ देखती ही नही. मी काही दिसायला देखणा नव्हतो आणि मी स्वतःलासुध्दा देखणा समजत नव्हतो. मेरे मे इतना गटस् ही नही था की मै उनसे बात कर सकू. एक छोटीशी गोष्ट सांगतो, मी 14 वर्षांचा होता तर माझी बहिण त्यावेळी काॕलेजात शिकत होती. एकदा तिची सायकल पंक्चर झाली आणि तिने मला ती दुरूस्त करुन आणायला सांगितली. मी तिच्यासोबत सायकलच्या दुकानावर गेलो आणि त्याला म्हणालो, ये ठीक कराना है. त्यावेळी तो दुकानदार जे म्हणाला ते मी आजपर्यंत विसरु शकलेलो नाही. तो म्हणाला, मेमसाब, आप जाइये, ये नौकर को छोड के जाइये, ठीक करके मै सायकील इसको दे दुंगा!

त्यावेळी मला समजले की आपली स्थिती काय आहे. त्याला क्रिकेटची काहीच माहिती नव्हती. अगदी साधा माणूस होता बिचारा तो …पण त्याच्या या उत्तराने माझी बहिण एवढी नाराज झाली की ती म्हणाली, तुम ठीक तरह रहते भी नही. एक तो तुम हो भी नही गूडलुकिंग..और कपडे भी ऐसे डालते हो…! तर मला कुणी गुड लुकींग म्हटले तर ते मला अजुनही पटत नाही पण कुणी गूड क्रिकेटर म्हटले तर ते ठीक आहे.

रोमी भाटिया (Romi Bhatia) यांना त्यांनी कसे प्रपोज केले त्याच्या आठवणीत रमताना त्यांनी सांगितले, आम्ही कारने प्रवास करत होतो आणि रस्त्याच्या बाजूला अमूलचे एक मोठे जाहिरात होर्डीग लागले होते. त्या जाहिरातीत मी होतो आणि अमुलने इंग्रजीतील ‘कपल आॕफ दीज’ या शब्दांऐवजी त्यात ‘ कपिल आॕफ दीज मेक आॕल द डिफरन्स’ असे म्हटले होते आणि मला बटर खाताना त्यात दाखवलेले होते. फार मजेशीर जाहिरात होती ती…त्यावेळी सोबत असलेल्या रोमीला मी म्हणालो, रोम, इसका फोटो ले लो! तिने विचारले, क्यूँ? तर मी म्हणाले, बच्चों को दिखायेंगे! तेव्हा तिने मला विचारले, तु मला प्रपोज करतोय का? तेंव्हा मी म्हणालो होतो तुला काय वाटते…असे घडले होते.

रोमीचे वडील हाॕवर्डमध्ये शिकलेले, आजोबा आॕक्सफर्डमध्ये शिकलेले. हमारे लिये स्कुल मे जाना ही बहूत बडी बात थी. काॕलेज भी मुश्किल से पहुँचते थे. त्यामुळे या दोन बुजूर्गांशी जेंव्हा भेट झाली तेंव्हा मी म्हणालो की तुमच्याकडे कल्चर, पूर्ण कल्चर आहे आणि आमच्याकडे अॕग्रीकल्चर. हमारे तो 7 पुश्तोंमे किसी ने सिटी नही देखी थी! मला खूप फरक आहे असे म्हणायचे होते आणि मी क्रिकेटपटूंच्या संदर्भात ते बोललो होतो. कारण मी अॕग्रीकल्चर बॕकग्राउंडमधून आलो होतो आणि त्यावेळचे इतर सर्व क्रिकेटपटू कल्चर्ड बॕकग्राऊंडमधून आलेले होते कारण त्या काळात केवळ कल्चर्ड लोकंच क्रिकेट खेळायचे. अॕग्रिकल्चर नहीं खेलते थे! तर मी असे काही म्हणालो होतो की मी यांच्याकडून खूप काही शिकलो. शायद इन्होने मेरे से अॕग्रीकल्चर नही सिखा!

रोमीच्या वडिलांना वाटत होते की, क्रिकेट खेळतो, ठीक आहे. पण तिच्या आजोबांना प्रश्न होता की क्रिकेट खेलता है वो तो ठीक है पर करता क्या है! त्यावेळी ते 90 वर्षांचे असतील आणि त्याकाळात क्रिकेटची आजच्यासारखी क्रेझ नव्हती. त्यांना म्हणायचे होते की काही कामधाम करतो की नाही? आता तर आयपीएल जो खेळतो त्यालासुध्दा तू काय करतो असे कुणी विचारणार नाही. आयपीएल खेळतो म्हणजे त्याच्या सात पिढ्यांची सोय झालीय असेच लोक आता मानतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER