‘त्या’ मुलीला कोणीतरी आधार द्या ; सोनू सूदची देशवासीयांकडे साद

Sonu Sood

मुंबई : देशभरात कोरोना (Corona) संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला . या प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) अनेकांना मदत केली पण एका मुलीला मात्र मदत करणं त्याला शक्य होत नाहीये. यासाठी त्याने देशभरातील इतर नागरिकांना मदत मागितली आहे.

सकाळी उठल्या उठल्या मी एक बातमी पाहिली. एका लहान मुलीच्या आई-वडील आणि भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इतक्या लहान वयात ती मुलगी अनाथ झाली आहे. त्या मुलीला मदत करण्यासाठी कोणीतरी पुढे या. तिला तुमच्या आधाराची गरज आहे. शक्य नसल्यास मला कळवा, मी तिला मदत करेनच. अशा आशयाचे ट्विट करुन सोनूने मदत मागितली आहे.

दरम्यान कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात नि:स्वार्थपणे लोकांची सेवा करणाऱ्या सोनू सूदवर देशभरात कौतुकाचा वर्षाव होत आहे .

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button