नीतीश कुमारांचा रिमोट दुसऱ्या कुणाकडे तरी असणार : काँग्रेस

Tariq Anwar & Nitish Kumar

पाटणा : जेडीयूचे नेते नीतीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत. नीतीश कुमार यांच्यावर भाजपाचे नियंत्रण राहील, असे सूचित करताना काँग्रेस नेते तारिक अन्वर (Tariq Anwar) म्हणालेत – नीतीश कुमार (Nitish Kumar) यांना नियंत्रित करण्याचा  रिमोट दुसऱ्या कुणाकडे असेल.

अन्वर यांनी ट्विट केले – नीतीश कुमार हे एनडीएचे चांगले नेते म्हणून नुकतेच समोर आले आहेत. मात्र यावेळी, त्यांची शक्यता सारखीच नसेल. भाजपाने त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे. भलेही त्यांची एनडीएचे नेते किंवा मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे, मात्र दुसऱ्या कुणाकडे तरी त्यांना नियंत्रित करण्याचा  रिमोट कंट्रोल असेल.

सोमवारी सकाळी ११.३० वाजता नीतीश कुमार यांचा शपथविधी पार पडणार आहे. सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा नीतीश कुमार मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. एनडीएची बैठक आज पार पडली असून त्यानंतर नीतीश कुमार यांची नेतेपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. भाजपाला जास्त जागा मिळाल्याने नीतीश कुमार यांच्या हातातून मुख्यमंत्रिपद निसटणार असल्याची शक्यताही वर्तवली जात होती. भाजपा नेत्यांनी एकीकडे नीतीश कुमारच मुख्यमंत्री होतील, असं  स्पष्ट केलं असताना नीतीश कुमार यांनी मात्र मौन बाळगलं होतं. मी मुख्यमंत्रिपदासाठी दावा केला नाही, असंही म्हटलं  होतं. पण एनडीएच्या बैठकीत नीतीश कुमार यांची नेतेपदी निवड करत चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER